मुंबई - होळीचा सण काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. होळीच्या रंगात रंगण्यासाठी सेलेब्रिटींनीही तयारी सुरु केली आहे. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा पती निक जोनाससोबत होळीचा आनंद लुटण्यासाठी भारतात आली आहे. निकने प्रियांकासोबत पहिल्यांदाच होळी साजरी करत तिच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
![Nick Jonas Celebrates his First holi with Priyanka chopra](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/nick_0703newsroom_1583569656_511.jpg)
अंबानी होळी सेलिब्रेशन पार्टीमध्ये बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी निक आणि प्रियांकाच्या जोडीने सर्वांचे लक्ष वेधले. पाच दिवसांपूर्वीच माझी पहिली होळी. माझं दुसरं घर असलेल्या भारतात होळी साजरी करताना खूप मजा आली', असे कॅप्शन देत त्याने हे फोटो पोस्ट केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -एकेकाळी भाडे देऊन राहणाऱ्या नेहाने घेतला स्वत:चा बंगला, शेअर केली आठवण
निक आणि प्रियांकाशिवाय कॅटरिना कैफ, विकी कौशल, राजकुमार राव, पत्रलेखा, हुमा कुरेशी, डायना पेंटी, जॅकलिन फर्नांडिस आणि अरमान जैन यांनीही या पार्टीत हजेरी लावून होळी साजरी केली. सोशल मीडियावर त्यांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'बागी ३' मधील मुलाची अॅक्शन पाहून टायगरची आई झाली भावूक