ETV Bharat / sitara

'मुंबई दिल्ली दी कुडिया', 'स्टुडंट ऑफ द ईअर २' मधील नवं गाणं प्रदर्शित - tiger shroff

'मुंबई दिल्ली दी कुडिया' असं या गाण्याचं शीर्षक आहे. गाण्यात टायगरचा नेहमीप्रमाणेच जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे.

'स्टुडंट ऑफ द ईअर २' मधील नवं गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Apr 24, 2019, 4:55 PM IST

मुंबई - टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्या मुख्य भूमिका असलेला 'स्टुडंट ऑफ द ईअर २' चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. आता या पाठोपाठ यातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

'मुंबई दिल्ली दी कुडिया' असं या गाण्याचं शीर्षक आहे. गाण्यात टायगरचा नेहमीप्रमाणेच जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे. तर त्याच्यासोबत अनन्या आणि तारा ठुमके लगावताना दिसत आहे. देव नेगी, पायल देव आणि विशाल दललानी यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.

शेखर आणि विशाल यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे. तर रेमो डिसूझाने हे गाणं कोरिओग्राफ केले आहे. पुनित मल्होत्रा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे तर करण जोहरची निर्मिती असणार आहे. येत्या १० मेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.