ETV Bharat / sitara

मैं दिवाना तेरा, 'अर्जून पटियाला'मधील पहिलं गाणं प्रदर्शित - kriti sanon

अर्जुन पटियाला या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या ट्रेलरला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

मैं दिवाना तेरा
author img

By

Published : Jun 26, 2019, 3:57 PM IST

मुंबई - नुकतंच लुका छुपी चित्रपटातून अभिनेत्री क्रिती सेनॉन प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. चित्रपटगृहे गाजवणाऱ्या या सिनेमानंतर आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. अर्जुन पटियाला असं तिच्या आगामी सिनेमाचं नाव आहे.

काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या ट्रेलरला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मैं दिवाना तेरा, असं शीर्षक असलेल्या या गाण्यावर क्रिती आणि दिलजीत दोसांझ ठुमके लगावताना दिसत आहेत.

'लड़की पटाने वाला ओरिजनल गाना' असं म्हणत हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. गाण्याला पंजाबी गायक गुरू रंधावानं आवाज दिला आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंतीही मिळत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या एका तासात या गाण्याला २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.