मुंबई - बिग बजेट 'साहो' सिनेमा सुरुवातीपासूनच अनेक कारणांने चर्चेत राहिला. श्रद्धा कपूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. नुकतीच या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट घोषित करण्यात आली.
यापाठोपाठ आता सिनेमाचं आणखी एक नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा लूक पाहायला मिळत आहे. या सिनेमात ते रॉय नावाचं पात्र साकारणार आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जॅकी श्रॉफनं आपला लूक शेअर केला आहे.
-
SAY YES OR DIE#Roy #SaahoOnAugust30 #Saaho pic.twitter.com/1w261hG0cl
— Jackie Shroff (@bindasbhidu) August 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">SAY YES OR DIE#Roy #SaahoOnAugust30 #Saaho pic.twitter.com/1w261hG0cl
— Jackie Shroff (@bindasbhidu) August 8, 2019SAY YES OR DIE#Roy #SaahoOnAugust30 #Saaho pic.twitter.com/1w261hG0cl
— Jackie Shroff (@bindasbhidu) August 8, 2019
दरम्यान 'साहो'चा ट्रेलर येत्या १० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हा सिनेमा ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सुजित यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मल्ल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.