मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अनेक अडथळ्यांनंतर प्रदर्शनासाठी सज्ज झालेल्या या बायोपिकचं एक पोस्टर सोमवारी नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आलं होतं. यानंतर आता आणखी एक नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
या पोस्टरमध्ये विवेक ओबेरॉयचा मोदींच्या वेशभूषेतील लूक पाहायला मिळत असून यात विवेक आरती करताना दिसत आहे. तर मागील पोस्टरप्रमाणेच या पोस्टरवरही आ रहा हूँ दोबारा, अब कोई रोक नहीं सकता, या ओळी लिहिल्या आहेत. अडथळ्यांनंतर होणारं चित्रपटाचं प्रदर्शन आणि लोकसभा निवडणूकांचा निकाल या दोन्हीचा विचार करत पोस्टरवर हे कॅप्शन दिल्याचं म्हटलं जात आहे.
![pm narendra modi biopic](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3351316_modi.jpg)
निवडणुकांच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २४ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर नुकतंच गुजरातच्या अहमदाबादमध्ये या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग पार पडलं. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीदेखील हजर होते.