ETV Bharat / sitara

'ढूंढे अखियां': 'जबरिया जोडी'चं लव साँग प्रदर्शित - siddharth malhotra

'ढूंढे अखियां' असं शीर्षक असलेल्या या गाण्यात परिणीती आणि सिद्धार्थची लव केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. गाण्याला यसीर देसाई आणि अल्तामाश फरीदी यांनी आवाज दिला आहे.

'जबरिया जोडी'चं लव साँग प्रदर्शित
author img

By

Published : Jul 18, 2019, 11:53 PM IST

मुंबई - सिद्धार्थ आणि परिणीती चोप्राची जोडी 'हसी तो फसी' चित्रपटानंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'जबरिया जोडी' चित्रपटातून हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून काही दिवसांपूर्वीच चित्रटाचा ट्रेलर आणि एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. आता यापाठोपाठ सिनेमातील रोमँटिक लव साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

'ढूंढे अखियां' असं शीर्षक असलेल्या या गाण्यात परिणीती आणि सिद्धार्थची लव केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. गाण्याला यसीर देसाई आणि अल्तामाश फरीदी यांनी आवाज दिला आहे. तर रश्मी आणि विराग यांचे बोल आहेत. २ मिनीट ४६ सेकंदाचं हे गाणं प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकेल.

दरम्यान 'जबरिया जोडी' चित्रपटात परिणीती आणि सिद्धार्थशिवाय अपारशक्ती खुराणा, संजय मिश्रा आणि जावेद जाफरी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. बिहारच्या पकड़वा विवाह पद्धतीवर हा चित्रपट आधारित असणार आहे. येत्या २ ऑगस्टला परिणीती आणि सिद्धार्थ प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.