मुंबई - नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे यांच्या आगामी 'रात अकेली है' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरनंतर राधिका ट्विटरवर ट्रेंड करीत आहे.
'रात अकेली है' चा ट्रेलर जबरदस्त आहे. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपट नवाजुद्दीन एका रुबादार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला आहे. याचे नाव आहे जटिल यादव. २ मिनिटे १६ सेकंदाचा हा ट्रेलर पाहताना नजर हटत नाही. नवाजचा दमदार रोल आणि यातील रहस्य आपले लक्ष केंद्रीत करण्यास यशस्वी झाले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नवाजुद्दीनने हा ट्रेलर आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ''नाव लक्षात ठेवा इन्स्पेक्टर जटिल यादव.''
ट्रेलर पाहिल्यानंतर अंदाज येतो की, हा चित्रपट एका परिवाराशी संबंधित आहे, ज्याच्यात घर मालक ठाकूर रघुबीर सिंग याचा मृत्यू झाला आहे. नंतर लक्षात येते की हा मृत्यू खूनामुळे झाला आहे. या खूनाचा तपास करताना जटिल यादव कसोशीने प्रयत्न सुरू करतो. नंतर त्याच्या लक्षात येते की रघुबीरचे आणि त्या कुटुंबातील नाते बरे नव्हते.
हेही वाचा - 'मैं मुलायम सिंह यादव' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
अनेक धक्के देणारी वळणे या चित्रपट असल्याचे ट्रेलरवरून लक्षात येते. 'रात अकेली है' चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत राधिका आपटे, श्वेता त्रिपाठी, निशांत दहिया, तिग्मांशु धूलिया आणि इतर कलाकार आहेत.
'रात अकेली है' हा चित्रपट ३१ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.