ETV Bharat / sitara

उमेश शुक्ला यांच्या आगामी थरारक चित्रपटात झळकणार नवाजुद्दीन सिद्दीकी - उमेश शुक्ला यांचा आगामी थरारक चित्रपट

निर्माता उमेश शुक्ला यांच्या आगामी चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा एक थरारक अनुभव देणारा चित्रपट असणार असल्याचे शुक्ला यांनी म्हटलंय.

Nawazuddin Siddiqui
नवाजुद्दीन सिद्दीकी
author img

By

Published : Oct 12, 2020, 8:15 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच चित्रपट निर्माता उमेश शुक्ला यांच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन सेजल शाह करणार आहेत. पटकथा भावेश मंडलिया यांनी लिहिली आहे.

नव्या चित्रपटाविषयी नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, "मी नेहमीच एक आव्हानात्मक भूमिका शोधत असतो. तशीच या चित्रपटाची कथा आहे. लोकांना नक्कीच यात रुची असेल. या मनोरंजक ग्रपबरोबर काम करताना तुम्ही आमच्याकडून अशी अपेक्षा ठेवू शकता की, असे काही तरी घडणार आहे, ज्याची तुम्ही अपेक्षा ठेवली नव्हती.''

निर्माता उमेश शुक्ला 'ओ माय गॉड' आणि '102 नॉट आउट' सारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखले जातात.

चित्रपट निर्माते उमेश शुक्ला म्हणाले, "हिरो नेहमी आमच्यातच असतो. जसे की, या चित्रपटात नवाजुद्दीन सारखा एक्स्ट्राऑडनरी लोक आहेत, तेव्हा या चित्रपटाचा थरार अनुभवण्यासाठी तयार रहा.''

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.