मुंबई - मुंबईला मायानगरी आणि फिल्मनगरी असेही म्हणतात. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी देखील आहे. इथे आलेल्याचे नाणे एकदा खणखणीत वाजले की मग दिवसरात्र त्याची चांदी होत असते. चित्रपट जगतातील असेच एक उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी. अनेक अडथळ्यांचा सामना करीत नवाज मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. आज त्यांच्याकडे संपत्ती आहे, प्रसिद्धी आहे आणि त्या जोरावर त्याने मुंबईत आलिशान बंगला उभारला आहे. आता सोशल मीडियावर नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बंगल्याच्या फोटोंनी जोर पकडला आहे.
![नवाजुद्दीन सिद्दीकीचा बंगला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14304442_4.png)
युपीच्या छोट्या खेड्यातील आहे नवाजुद्दीन
ग्रामीण शेतीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून नवाजुद्दीन येतो. उत्तर प्रदेशातील छोड्या खेड्यातून अभिनयाच्या ओढीने मुंबईत दाखल झालेला नवाजुद्दीन आज बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकरांपैकी एक बनला आहे. त्याने केलेल्या असंख्य भूमिका संस्मरणीय ठरल्या.
![नवाजुद्दीन सिद्दीकीचा बंगला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14304442_5.png)
बंगल्याचे नामकरण
नवाजने स्वप्नांची नगरी मुंबईत स्वत:साठी स्वर्गासारखा आलिशान बंगला बांधला आहे. अभिनेत्याच्या बंगल्याच्या इंटिरियरसाठी तीन वर्षे लागली. हा बंगला त्याच्या बुढाणा गावातल्या त्याच्या आधीच्या घरापासून प्रेरित असल्याचं सांगण्यात येत आहे. नवाजने आपल्या वडिलांच्या सन्मानार्थ आपल्या बंगल्याला 'नवाब' असे नाव दिले आहे.
![नवाजुद्दीन सिद्दीकीचा बंगला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14304442_1.png)
नवाजचे फिल्मी करियर
नवाजने 'सरफरोश' (1999) या चित्रपटातून छोट्या भूमिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर तो राम गोपाल वर्माच्या 'शूल' (1999) चित्रपटातही दिसला होता. त्याचवेळी राजकुमार हिरानी यांच्या सुपरहिट चित्रपट 'मुन्नाभाई एमबीबीएस' (2003) मध्ये चोराची भूमिका साकारून नवाजला ओळख मिळू लागली, पण त्यानंतर अनुराग बसूच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' (2012) या चित्रपटातून नवाजने अभिनेता म्हणून दबदबा निर्माण केला. त्याचा हा दबदबा आजही टिकून आहे.
![नवाजुद्दीन सिद्दीकीचा बंगला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14304442_2.png)
नवाजुद्दीन सिद्दीकीचे आगामी चित्रपट
नवाजुद्दीनच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, कंगना रणौत दिग्दर्शित 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटात तो अभिनेता म्हणून दिसणार आहे. त्याचबरोबर तो अभिनेता टायगर श्रॉफच्या 'हिरोपंती-2' या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा - श्रुती हासनच्या वाढदिवसानिमित्त प्रसिध्द झाला 'सलार' चित्रपटातील फर्स्ट लूक