मुंबई - मुंबई शहरात बुधवारी मुसळधार पाऊस पडत असताना बॉलिवूड स्टार कंगना रणौतने पावसाळ्याचे एक रोमँटिक पोस्ट लिहून स्वागत केले आहे.
मान्सूनचा हंगाम हा प्रेम आणि रोमान्सशी जोडला गेलेला आहे. सर्व हंगामांपैकी मान्सून हा कोणाबरोबर तरी राहण्याचा सर्वात रोमँटिक काळ असतो आणि कंगनाची नवी सोशल मीडिया पोस्ट सुचवते की तीदेखील या हंगामात रोमांचित झाली आहे.
![Mumbai rains make Kangana romantic](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12070800_p.jpg)
बुधवारी कंगनाने स्वत: चा एक जबरदस्त आकर्षक फोटो इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनेलिहिलंय, ''मुंबईतील पावसाळ्याहून अधिक रोमँटिक काही असत नाही, पण अविवाहित लोक फक्त दिवास्वप्न पाहू शकतात,” असे कंगनाने लिहिले. पुढे लिहिले, की माझ्याशी कोण सहमत आहे सांगा.
कंगना ही एक बोल्ड व्यक्तीमत्व असलेली अभिनेत्री असली तरी तिने आपली रोमँटिक बाजू चाहत्यांसाठी शेअर केली आहे. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर ती मनालीहून मुंबईत परतली आहे. मंगळवारी, तिने तिच्या अंशतः पाडलेल्या कार्यालयाला भेट दिली आणि मालमत्तेच्या नूतनीकरणाबद्दल काही व्यक्तींशी सल्लामसलत केली.
हेही वाचा - ‘बाळकडू’ची निर्माती स्वप्ना पाटकरला ‘चीटिंग’साठी झाली अटक!