ETV Bharat / sitara

‘आदिपुरुष’ सिनेमाच्या ‘मोशन कॅप्चर’ला सुरुवात, ओम राऊतने शेअर केला फोटो - प्रभास

प्रभास आणि सैफ अली खान अभिनीत ३ डी ‘मॅग्नम ओपस’ ‘आदिपुरुष’ चे ‘मोशन कॅप्चर’ सुरू करण्यात आले. ‘मोशन कॅप्चर’ हे ‘सीजीआय’ साठी शूट करण्यात येते व नंतर डिजिटली चित्रपटामध्ये वापरण्यात येते. हे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान असून ‘कॉम्प्युटर ग्राफिक्स’ साठी वापरले जाते. हॉलिवूडमधील ‘अवतार, ‘एवेन्जर्स’ सारख्या चित्रपटांतून ते प्रभावीपणे वापरण्यात आले होते.

adipurush
adipurush
author img

By

Published : Jan 20, 2021, 5:16 AM IST

मुंबई - ओम राऊतने ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ च्या अभूतपूर्ण यशानंतर ‘आदिपुरुष’ या ३-डी चित्रपटाची घोषणा मोठ्या धुमधडाक्यात केली. लॉकडाऊन सैल झाल्यानंतर तो हैदराबादला पोहोचला आणि मुख्य पात्रासाठी ‘बाहुबली’ फेम कलाकार प्रभासचा होकार मिळवूनच परतला. हा चित्रपट रामायणावर आधारित असून प्रभास रामाच्या भूमिकेत तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकतेच प्रभास आणि सैफ अली खान अभिनीत ३ डी ‘मॅग्नम ओपस’ ‘आदिपुरुष’ चे ‘मोशन कॅप्चर’ सुरू करण्यात आले. ‘मोशन कॅप्चर’ हे ‘सीजीआय’ साठी शूट करण्यात येते व नंतर डिजिटली चित्रपटामध्ये वापरण्यात येते. हे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान असून ‘कॉम्प्युटर ग्राफिक्स’ साठी वापरले जाते. हॉलिवूडमधील ‘अवतार, ‘एवेन्जर्स’ सारख्या चित्रपटांतून ते प्रभावीपणे वापरण्यात आले होते.

adipurush
ओम राऊतने शेअर केलेला फोटो
यावर बोलताना, भूषण कुमार म्हणतात, "टी-सीरीजमध्ये आम्ही नेहमीच नवीन कल्पना आणि संकल्पनांना प्रोत्साहन दिले आहे आणि यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानासह चित्रपट निर्मितीचा मार्ग सुलभ करतो. ओम आणि त्यांची टीम ‘आदिपुरुष’ च्या जगताची निर्मिती करत आहेत. हे तंत्रज्ञान शक्यतो आंतरराष्ट्रीय सिनेमांतून वापरले जाते आणि हे तंत्रज्ञान वापरणारा ‘आदिपुरुष’ हा भारतातील पहिला सिनेमा असेल आणि अर्थातच हे तंत्रज्ञान भारतीय प्रेक्षकांपर्यंत नेता येतेय याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे.”निर्माता प्रसाद सुतार पुढे म्हणाले, “रिअल-टाइम तंत्रज्ञानासह एकत्रित उच्चस्तरीय दृश्यप्रभाव आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये सामान्यतः वापरला जातो आणि यामुळे चित्रपट दिग्दर्शकांना त्यांची कथाकथन करण्यास नेहमीच मदत करतात. आदिपुरुषाचे जग निर्माण करण्यासाठी आणि महाकथा सांगण्यासाठी आम्ही तेच एकत्र आणत आहोत. आदिपुरुष हे आपल्या सर्वांसाठी एक प्रचंड मोठे मिशन आहे आणि आम्ही भूषणजीसमवेत या प्रवासात सोबत जाण्यासाठी उत्सुक आहोत.भूषण कुमार, टी-सीरिजचे कृष्ण कुमार आणि ओम राऊत, प्रसाद सुतार आणि रेट्रोफाइल्सचे राजेश नायर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. २ फेब्रुवारी २०२१ रोजी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा मुहूर्त होणार आहे आणि ११ ऑगस्ट २०२२ ला तो प्रदर्शित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.