ETV Bharat / sitara

'बर्थ डे'च्या दिवशी पोलिसांचा ससेमिरा, मिथुन चक्रवर्तीला 'कोब्रा' बनणे पडले महाग

मिथुन चक्रवर्तीचा आज ७१ वा वाढदिवस आहे. नेमके आजच्याच्याच दिवशी त्याची पोलीस चौकशी करण्यात आली. निवडणुकीच्या सभेत त्याने केलेली डायलॉगबाजी त्याला महाग पडल्याचे दिसत आहे.

Mithun Chakraborty
मिथुन चक्रवर्ती
author img

By

Published : Jun 16, 2021, 3:38 PM IST

Updated : Jun 16, 2021, 4:00 PM IST

कोलकाता - कोर्टाच्या आदेशानंतर मिथुन चक्रवर्ती यांची आज बुधवारपासून चौकशी सुरू झाली आहे. माणिकतला पोलिस स्टेशनचे अधिकारी यांनी बुधवारी मिथुन चक्रवर्तीची आभासी चौकशी केली. मिथुनवर त्याच्या चित्रपटील डायलॉगचा वापर करीत लोकांना भडकवण्याचा आरोप आहे.

निवडणुकीनंतर हिंसा भडकवण्याचाही आहे मिथुनवर आरोप

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्तीची त्यांच्या वाढदिवशी माणिकतला पोलीस आभासी चौकशी करण्यात आली. सकाळी दहाच्या सुमारास त्याच्या चौकशीस सुरूवात झाली व पोलिसांनी त्यांचा जवाब नोंदवला आहे. मिथुन चक्रवर्तीच्या वादग्रस्त विधानांवर ही चौकशी करण्यात आलीय

महत्त्वाचे म्हणजे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी अभिनेता मिथुन चक्रवर्ती मार्चच्या पहिल्या आठवड्यात भाजपमध्ये दाखल झाला होता. कोलकाता येथील ब्रिगेड मैदानावर मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये दाखल झाले. यादरम्यान, त्यांनी स्टेजवरुन बोलताना आपल्या चित्रपटातील काही लोकप्रिय संवादांची डायलॉगबाजी केली. तो म्हणाला की मी कोब्रा आहे. ७ मार्चला आयोजित एका रॅलीत त्यांनी हे वक्तव्य केले होते.

'मारूंगा यहां लाश गिरेगी शमशान में'

या दरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी 'मारूंगा यहां लाश गिरेगी शमशान में' हा त्यांचा प्रसिद्ध संवादही मंचावरुन उच्चारला. यानंतर ते म्हणाले की हा संवाद जुना झाला आहे आणि आता नवीन संवाद आहे ''मी पाण्यातला साप नाही, मी कोब्रा आहे. दंश केल्यावर काम तमाम होईल.''

या डायलॉगबाजीबाबत कोलकाताच्या माणिकतला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मिथुन चक्रवर्ती यांच्या या द्वेषयुक्त भाषणामुळे निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मिथुन चक्रवर्ती यांच्याविरूद्ध माणिकतला पोलीस ठाण्यात कलम १५३ ए, ५०४, ५०५ आणि १२० बी अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या तक्रारीनंतर मिथुन चक्रवर्ती यांनी कोलकात्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना स्पष्टीकरण दिले की २०१४ च्या एका चित्रपटामधील हा त्यांचा प्रसिद्ध संवाद होता, जो त्यांनी लोकांच्या मनोरंजनासाठी जाहीर सभांमध्ये बोलला होता. त्याचा इतर कोणताही उद्देश नव्हता.

मिथून यांनी ही तक्रार फेटाळून लावण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता, जो कोर्टाने फेटाळून लावला आणि मिथुन चक्रवर्ती यांची कसून चौकशी करण्यास पोलिसांना सांगितले.

हेही वाचा - प्रेरणादायी कथांना सलामी देणारे गीत ‘मैं शेरनी‘ झाले प्रदर्शित!

Last Updated : Jun 16, 2021, 4:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.