मुंबई - अभिनेता संजय दत्त याने आपले वडील सुनिल दत्त यांना श्रध्दांजली वाहिली आहे. आज त्यांचा १५ वा स्मृतिदिन आहे. संजयने यावेळी त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दोघांचे काही जुने फोटो पाहायला मिळतात.
"माझ्या पाठीशी तुम्ही असाल तेव्हा माहीत होते की, मला कशाचीही चिंता करण्याची गरज नाही. नेहमी माझी पाठ थोपटल्याबद्दल धन्यवाद. आज आणि दररोज डॅडी तुमची आठवण येते," असे संजयने लिहिले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सुनील दत्त यांचे 25 मे 2005 रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या असंख्य संस्मरणीय कामांपैकी हमराज, रेश्मा और शेरा, गुमराह, मेरा साया, मदर इंडिया, वक्त, पडोसन आणि साधना यासारख्या चित्रपटांमधील भूमिका होत्या. २००३ मध्ये संजय दत्त अभिनीत मुन्ना भाई एम.बी.बी.एस. चित्रपटामध्ये त्याने आयुष्यातील शेवटचा अभिनय केला. यात मुलगा आणि वडील यांच्या नात्यावर भाष्य करण्यात आले होते.
सुनील दत्त यांची राजकीय कारकीर्दही यशस्वी होती. १९८४ मध्ये त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आणि २००५ मध्ये मृत्यू होईपर्यंत पाच वेळा ते खासदार राहिले.