मुंबई - दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या बहुचर्चित 'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. 'रंग दे बसंती', 'भाग मिल्खा भाग', 'मिर्जिया' आणि 'दिल्ली ६' या दमदार चित्रपटानंतर त्यांच्या 'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' या चित्रपटातून स्वच्छता तसेच महिला सुरक्षा आणि इतर गंभीर विषयांवर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील दुसरे गाणे नुकतच रिलीज करण्यात आले आहे.
या गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले आहेत. तर अरजित सिंगने हे गाणे गायले आहे. या गाण्यात ८ वर्षाचा कन्हैय्या आणि त्याचे मित्र मुंबईच्या रस्त्यावर बालमजूरी करताना दिसतात. चित्रपटाच्या टायटलवरच हे गाणं साकारलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
या चित्रपटात अंजली पाटील, मकरंद देशपांडे, रसिका अगाशे, सोनिया अल्बिजुरी, अतुल कुलकर्णी आणि नचिकेत पूर्णापत्रे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. शंकर-एहसान-लॉय यांनी सिनेमाला संगीत दिले असून गीतांचे शब्द गुलजार यांच्या लेखणीतून अवतरले आहेत.
या चित्रपटाची निर्मिती डॉ. जयंतीलाल गडा आणि पीव्हीआर सिनेमा एकत्रितपणे करत आहेत. हा चित्रपट १५ मार्चला प्रदर्शित होणार आहे.