मुंबई - अभिनेता जॉन अब्राहम याने शनिवारी 'मेरा भारत महान' अशी एक कविता सोशल मीडियावर शेअर केली. या कवितेची बॉलीवूड मधील बऱ्याच कलाकारांनी प्रशंसा केली आहे. जॉनने या कवितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लाॉकडाऊन सुरू आहे, त्या परिस्थितीवर आधारीत ही कविता आहे.
सध्या देशभरात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊन मुळे अनेक गोरगरीब, मजूर, शेतकरी यांचे हाल होत आहेत. दुसरीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य प्रशासन, पोलीस यंत्रणा, सफाई कर्मचारी, अन्न पुरवठा कामगार हे सर्व अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे या सर्वांना प्रेरणा देण्यासाठी जॉनने एका कवितेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या कवितेतून त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.
मिलाप झवेरी यांनी ही कविता लिहिली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'सडके है लावारिस, घर बैठा इंसान हैं... जहा खेलते थे सब बच्चे, खाली वो मैदान हैं... मंदिर और मस्जिद हैं बंद, खुली राशन की दुकान हैं.. हौसला हैं फिर भी दीलो में, क्योकी मेरा भारत महान हैं..',अशा या कवितेच्या ओळी आहेत.
2 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये कोरोनामुळे सध्या देशात कशी परिस्थिती आहे, याचे वर्णन करण्यात आले आहे.
या व्हिडिओवर कारण जोहर, रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, अनिल कपूर यांच्यासह बऱ्याच कलाकारांनी तसेच चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.