ETV Bharat / sitara

'पृथ्वीराज'साठी मी माझे हृदय, आत्मा आणि अश्रू दिले - मानुषी छिल्लर - पृथ्वीराजमध्ये मानुषी छिल्लर

2017ची मिस वर्ल्ड विजेती मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या आगामी पीरियड ड्रामा पृथ्वीराज ( Prithviraj) मध्ये राजकुमारी संयोगिताच्या भूमिकेत दिसणार आहे. यशराज फिल्म्समधून ती चित्रपटात सुपरस्टार अक्षय कुमारसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे.

मानुषी छिल्लर
मानुषी छिल्लर
author img

By

Published : Nov 16, 2021, 5:37 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) - यशराज फिल्म्सच्या पहिल्या ऐतिहासिक एपिक अॅक्शन ड्रामा 'पृथ्वीराज' ( Prithviraj)चा नुकताच रिलीज झालेला टीझर लक्षवेधी ठरला आहे. निर्भय आणि पराक्रमी राजपूत राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आणि पराक्रमावर आधारित या चित्रपटात अक्षय कुमारची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटात मिस वर्ल्ड २०१७ मानुषी छिल्लर ही राजकुमारी संयोगिताच्या भूमिकेत आहे. भारतातील एका मोठ्या नामांकित बॅनरखाली ती बॉलिवूड पदार्पण करीत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

नवोदित अभिनेत्री मानुषी कृतज्ञता करताना म्हणाली, "मी YRF आणि माझे दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांची सदैव ऋणी आहे. त्यांनी माझ्यावर राजकुमारी संयोगिताची भूमिका करू शकेन असा विश्वास दाखवला. मी मोठ्या पदार्पणासाठीची विचारणा केलेली नसतानादेखील पडद्यावर राजकुमारी साकारायला मिळणे मला सन्मान वाटतो."

तिच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना मानुषी म्हणते, "राजकुमारी संयोगिताचे जीवन, तिची मूल्ये, तिची लवचिकता, तिची हिंमत, तिचा सन्मान यावरून खूप दंतकथा बनल्या आहेत. याबद्दल तयारीच्या प्रक्रियेत मला खूप काही कळले. पडद्यावर राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारताना मी तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तिची कथा पाहण्यासाठी मी प्रत्येकांसारखीच उत्सुक आहे."

"मी या चित्रपटासाठी माझे हृदय, आत्मा आणि अश्रू दिले आहेत आणि मला आशा आहे की मोठ्या पडद्यावर अशा आयकॉनिक रिअल लाइफ लीजेंडची भूमिका करण्याचा माझा प्रयत्न लोकांना आवडेल. मी अक्षय सरांची आभारी आहे." असे ती पुढे म्हणाली.

यशराज फिल्म्स निर्मित, पृथ्वीराज हा चित्रपट चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित असून या चित्रपटात संजय दत्त आणि सोनू सूद यांच्याही भूमिका आहेत. 21 जानेवारी 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - विजय देवरकोंडाने शेअर केला माइक टायसनसोबतचा फोटो.. म्हणाला, "हा माणूस म्हणजे प्रेम आहे"

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.