मुंबई - बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीच्या वडिलांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मतानुसार, मनोजच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. जेव्हा मनोज बाजपेयीला त्यांच्या वडिलांच्या आजाराची बातमी मिळाली, तेव्हा तो केरळमध्ये शुटिंग करीत होता. बातमी कळताच शुटिंग सोडून दिल्लीला रवाना झाला. मनोज बाजपेयीचे वडील राधाकांत बाजपेयी हे शेतकरी आहेत.
मनोज बाजपेयी आजकाल केरळमध्ये आपल्या नवीन प्रोजेक्टचे शुटिंग करीत आहे. अलिकडेच त्याने इंदूरमध्ये स्वयंघोषित समिक्षक कमाल आर खानच्या विरोधात मानहानी याचिका दाखल केली होती. त्यामुळे तो चर्चेत आला होता.
कमल आर खान याने 'द फॅमिली मॅन -2' या वेबसीरिजबाबत मनोज वाजपेयीवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मनोज बाजपेयी शेवटचा स्पाय थ्रिलर वेब सिरीज 'डायल 100' आणि 'द फॅमिली मॅन -2' मध्ये दिसला होता.
मनोज बाजपेयी हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर सत्ता गाजवणारे अभिनेता म्हणून ओळखला जातो. मनोजने आतापर्यंत अनेक वेब-सिरीजमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. अलीकडेच त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल सांगितले होते की अनेक महान अभिनेते ओटीटीवर आपली प्रतिभा सिध्द करीत आहेत. त्यांच्याकडून मीदेखील शिकत असतो. छोट्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये इतके नाव मिळत नाही पण ओटीटीने त्यांना मोठी संधी दिली आहे.
मनोज बाजपेयी हा बिहारचा रहिवासी आहे आणि राजधानी दिल्लीत शिक्षण घेण्यासाठी आला होते. यानंतर तो अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईला पोहोचला होता. आज तो बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत वरच्या क्रमांकवर आहे.
हेही वाचा - जाणून घ्या, महेश कोठारे यांनी का मागितली 'जाहीर माफी'?