ETV Bharat / sitara

मलायकाने शेअर केले पारंपरिक वेशभूषेतील आकर्षक फोटो - अभिनेत्री मलायका अरोरा

अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या सोशल मीडियावर सक्रिय असते आणि आपले आकर्षक फोटो आणि व्हिडिओ शेअर करीत असते. यावेळी तिने मनिष मल्होत्राने डिझाईन केलेल्या लेहंगा चोळीतील काही फोटो शेअर केले आहेत.

Malaika Arora
अभिनेत्री मलायका अरोरा
author img

By

Published : Aug 17, 2020, 5:28 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने सोमवारी आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. मनिष मल्होत्राने डिझाईन केलेल्या पारंपरिक लेहंग्यामधील तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या आकर्षक फोटोंनी इंटरनेटवर वादळ तयार झालंय.

46 वर्षीय मलायकाने इंस्टाग्रामवर तिचे जबरदस्त आणि आकर्षक फोटो शेअर केले. लहरी लेहेंगा चोळीतील तिचे फोटो सनसनाटी ठरले आहेत. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या लेहेंग्यात तिने फोटोला पोज दिल्या आहेत. यात ती कमीत कमी दागिन्यांसह दिसत आहे.

मलायकाच्या या पारंपरिक लूकमध्ये तिने हातात हिरव्या बांगड्या आणि रिंग्ज घातल्या आहेत आणि कपाळावर टिकाही लावलेला दिसत आहे.

हे फोटो तिने डिझायनर मनिष मल्होत्राला टॅग केले आहेत, त्यानेही फोटो शूटमधील काही स्नॅप आणि व्हिडिओ शेअर केला आहे. पोस्ट-शेअरिंग प्लॅटफॉर्मवर 1 लाखाहून अधिक नेटिझन्सना मलायकाचा हा पारंपारिक अवतार आवडला.

मल्होत्रा ​​यांनीही कमेंट्स सेक्शनमध्ये मलायकाचे कौतुक केले. (दोन लाल हृदयाच्या इमोजीसमवेत). अमृता अरोरा हिनेही कमेंट्स सेक्शनमध्ये फायर आणि रेड हार्ट इमोजिस टाकल्या आहेत.

मलायका नेहमीच आपल्या सोशल मीडियावर सक्रिय असते आणि आपले आकर्षक फोटो आणि व्हिडिओ शेअर करीत असते. यापूर्वी तिने आपल्या कुत्र्यासोबतचे फोटोही शेअर केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.