मुंबई - बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत बऱ्याच राजकिय व्यक्तींच्या जीवनावर बायोपिक तयार झाले आहेत. मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित बायोपिक प्रदर्शित झाले होते. आता आगामी काळात जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिक देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांच्या जीवनावरील बायोपिक देखील सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. आता या बायोपिकचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
एका शेतकऱ्याचा मुलगा ते उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री असा मुलायम सिंग यादव यांचा प्रवास या चित्रपटात उलगडणार आहे. तसेच, त्यांच्या आयुष्यातील काही महत्वपूर्ण घडामोडी देखील या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
मुलायम सिंग यादव हे समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित मै मुलायम सिंग यादव या बायोपिकचे दिग्दर्शन सुवेन्दु घोष करत आहेत. हा बायोपिक १४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.