ETV Bharat / sitara

माधुरी आली माहेरी, प्लॅनेट मराठी सोबत करणार कन्टेन्ट-क्रिएशन,! - 'प्लॅनेट मराठी ओटीटी'

सुरुवातीपासूनच 'प्लॅनेट मराठी'सोबत अनेक नावाजलेल्या व्यक्ती जोडल्या गेल्या. त्यात आता माधुरी दीक्षितही 'प्लॅनेट मराठी'च्या परिवारात सहभागी झाली आहे. माधुरी सुद्धा आता प्लॅनेट मराठी सोबत मराठीत कन्टेन्ट-क्रिएशन करणार आहे.

माधुरी दीक्षित प्लॅनेट मराठी सोबत करणार कन्टेन्ट-क्रिएशन

author img

By

Published : Sep 2, 2021, 10:45 PM IST

अख्या देशाची ‘धक् धक् गर्ल’ म्हणजे माधुरी दीक्षित. सर्वांना घायाळ करणारे हास्य असणाऱ्या माधुरीला मराठी भाषा, मराठी संगीत, मराठी साहित्य ई. मध्ये खास रस आहे. बॉलिवूडमध्ये इतकी वर्षे काम करूनही आणि एक दशक परदेशात राहूनही ती आपली मुळं कधीच विसरली नाही. त्यामुळेच खास मराठी मनोरंजनासाठी जन्म घेतलेला प्लॅटफॉर्म प्लॅनेट मराठी सोबत ती जोडली गेलीय. नुकताच तिच्या हस्ते ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ लोकार्पण सोहळा संपन्न झाला. तुतारीची सलामी, फुलांची सजावट, ढोल ताशांचा गजर, राजेशाही थाट, उत्साहवर्धक वातावरण आणि या सगळ्या पारंपरिक सोहळ्यात माधुरीची दिमाखदार एंट्री झाली. जिच्या सदाबहार हास्याने आजही जगभरातील चाहत्यांच्या हृदयाची धक् धक् वाढते अशी आपली मराठी मुलगी माधुरी दीक्षित नेने ने 'प्लॅनेट मराठी ओटीटी'च्या ॲपचे लाँचिंग केले.

माधुरी दीक्षित प्लॅनेट मराठी सोबत करणार कन्टेन्ट-क्रिएशन
माधुरी दीक्षित प्लॅनेट मराठी सोबत करणार कन्टेन्ट-क्रिएशन

सुरुवातीपासूनच 'प्लॅनेट मराठी'सोबत अनेक नावाजलेल्या व्यक्ती जोडल्या गेल्या. त्यात आता माधुरी दीक्षितही 'प्लॅनेट मराठी'च्या परिवारात सहभागी झाली आहे. यापूर्वीच 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर आपली मोहोर उमटवणारा 'जून' चित्रपट प्रदर्शित झाला असून यापुढे प्रेक्षकांना 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर 'सोप्पं नसतं काही', 'हिंग पुस्तक तलवार', 'जॉबलेस', 'बाप बीप बाप', आणि 'परीस' या वेगवेगळ्या धाटणीच्या वेबसिरीज आणि काही मनोरंजनात्मक आणि दर्जेदार चित्रपट पाहता येणार आहेत. मनोरंजनाचा हा खजिना वेबसिरीज, वेबफिल्म्स आणि चित्रपटांपुरताच मर्यादित नसून हळूहळू प्रेक्षकांना 'प्लॅनेट मराठी ओटीटी'च्या जादुई पोतडीतून नवनवीन कंटेन्ट मिळणार आहे. माधुरी सुद्धा आता प्लॅनेट मराठी सोबत मराठीत कन्टेन्ट-क्रिएशन करणार आहे.

'प्लॅनेट मराठी ओटीटी' बरोबरच्या या नव्या नात्याबद्दल अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणते, ''मराठी फिचर फिल्म्स आणि आशयामध्ये खूपच क्षमता आहे, जी अजून जगभरातील प्रेक्षकांनी अनुभवलेली नाही. या व्यासपीठामुळे चित्रपट निर्मात्यांना शोधणे आणि त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीस्कर होणार आहे. जगभरातील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी केवळ मराठी ॲपची निर्मिती करणे, हे अक्षय बर्दापूरकर आणि त्यांच्या टीमने उचललेले एक कौतुकास्पद पाऊल आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्री एका वेगळ्याच उंचीवर पोहोचणार आहे. 'प्लॅनेट मराठी ओटीटी'ने प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा जो खजिना आणला आहे, तो खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे. हा माझा सन्मान आहे, की या सोहळ्याला मला आमंत्रित करण्यात आले. मी सुद्धा एक अशी मराठी प्रेक्षक आहे, जी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असले तरी मराठी चित्रपट, वेबसिरीज आवर्जून पाहाते.''

प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'प्लॅनेट मराठी ओटीटी'बद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले, '''प्लॅनेट मराठी ओटीटी' प्रेक्षकांच्या भेटीला येत असून दुग्धशर्करा योग म्हणजे माधुरी दीक्षित सारखी गुणी अभिनेत्री 'प्लॅनेट मराठी ओटीटी'च्या परिवारात सहभागी झाली आहे. आमच्या या परिवारात अनेक नावाजलेल्या व्यक्तींचा सहभाग होत आहे, याहून मोठी गोष्ट कोणती असू शकते? माधुरी दीक्षितबद्दल सांगायचे तर तीन दशकांहून अधिक काळ जिने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले, तिची जादू आजही कायम आहे. माधुरी काही काळ परदेशातही राहिली. मात्र महाराष्ट्राशी तिची नाळ जोडली गेल्याने ती परत मायदेशी परतली. 'प्लॅनेट मराठी ओटीटी'ही माधुरीसारखेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. 'प्लॅनेट मराठी ओटीटी' मार्फत प्रेक्षकांना दर्जेदार कंटेन्ट देण्याची आमची बांधिलकी आम्ही पूर्णपणे जपणार आहोत.''

माधुरी दीक्षितच्या हस्ते 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी 'प्लॅनेट मराठी'च्या 'म' या लोगोची पालखीतून मिरवणूकही काढण्यात आली. आज बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी माधुरी दीक्षित या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'प्लॅनेट मराठी ओटीटी'शी जोडली गेली आहे. या भव्य कार्यक्रमाला 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्यासह 'प्लॅनेट मराठी'च्या परिवारातील आणि मराठी मनोरंजन विश्वातील अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, सचित पाटील, प्राजक्ता माळी, भार्गवी चिरमुले, गायत्री दातार, संजय जाधव, सोनाली खरे, सायली संजीव, सुरभी हांडे, निखिल महाजन, दीप्ती देवी, भाग्यश्री मिलिंद, रेशम श्रीवर्धनकर, सुशांत शेलार या तारे-तारकांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा - यशस्वी अभिनेता असूनही सिध्दार्थला होते या गोष्टींचे व्यसन.... या 10 महत्वाच्या घटामोडींनी बदलले आयुष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.