मुंबई - आपलं सौंदर्य, नृत्य आणि हास्याने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या धकधक गर्लचा आज ५२ वा वाढदिवस. माधुरीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेवूया तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी -
बनायचे होते मायक्रोबायोलॉजिस्ट -
माधुरीचा जन्म १५ मे १९६७ ला महाराष्ट्रात झाला. माधुरीला मायक्रोबायोलॉजिस्ट बनायचे होते. यासाठी तिने मायक्रोबायोलॉजीची डिग्रीदेखील घेतली आहे.
एक उत्तम कथ्थक डान्सर -
नृत्य हा माधुरीचा लहानपणापासूनचा छंद आहे. तिने अवघ्या ३ वर्षांच्या वयात कथ्थक नृत्य शिकण्यास सुरूवात केली होती. यामुळेच पुढे ती एक प्रोफेशनल कथ्थक डान्सर म्हणून ओळखली जावू लागली.
अनेक चित्रपटांना मिळाले होते अपयश -
माधुरीचा १९८४ मध्ये आलेला 'अबोध' हा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला होता. यानंतर तिचे 'स्वाती', 'हिफाजत', 'दयावान' आणि 'खतरों के खिलाडी'सारखे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. मात्र, १९८८ मध्ये आलेल्या 'तेजाब' चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियतेचे शिखर गाठण्यास मदत केली. या चित्रपटातील 'एक दो तीन' गाणं तर आजही अनेकांच्या ओठी आहे.
गाण्यासाठी घातला होता ३० किलोचा ड्रेस -
माधुरीने 'देवदास' चित्रपटातील 'काहे छेडे मोहे' गाण्यासाठी ३० किलोचा घागरा घातला होता. विशेष म्हणजे ३० किलोच्या या ड्रेसमध्ये माधुरीने डान्सदेखील केला होता. हा ड्रेस डिझायनर निता लुल्ला यांनी डिझाईन केला होता.
सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री -