ETV Bharat / sitara

'पती पत्नी और वो' चं लखनौमधील चित्रीकरण पूर्ण, कार्तिकनं शेअर केला व्हिडिओ - भूमी पेडणेकर

कार्तिक आर्यननं चित्रपटाच्या सेटवरील केप कापून सेलिब्रेशन करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक आणि अनन्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम दिसत आहे. मात्र, भूमी पेडणेकर यात नाही

पती पत्नी और वोचं लखनौमधील चित्रीकरण पूर्ण
author img

By

Published : Sep 8, 2019, 8:40 PM IST

मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे ही जोडी पती पत्नी और वो सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाच्या चित्रीकरणाला लखनौमध्ये सुरुवात झाली. आता या सिनेमाच्या लखनौ शेड्यूलचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे.

कार्तिक आर्यननं चित्रपटाच्या सेटवरील केप कापून सेलिब्रेशन करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक आणि अनन्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम दिसत आहे. मात्र, भूमी पेडणेकर यात नाही. कार्तिकनं व्हिडिओला कॅप्शनही दिलं आहे.

पती पत्नी और वोचं लखनौ शेड्यूल पूर्ण. पत्नी जी म्हणजेच भूमी पेडणेकर नेहमीप्रमाणेच गायब आहेत. धन्यवाद लखनौ, असं त्यानं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन मुद्दसर अजीज करत आहेत. हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.