ETV Bharat / sitara

खिलाडी अक्षयची ट्विंकलवर मात, या खेळात केले 'चेकमेट' ! - chess game

अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो सध्या चर्चेत आहे. या फोटोत दोघेही बुध्दीबळ खेळताना दिसतात. या फोटोला दिलेले कॅप्शन मजेशीर आहे.

Khiladiyon Ka Khiladi
author img

By

Published : Jul 10, 2019, 1:16 PM IST

मुंबई - अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने एक फोटो शेअर केलाय. याला तिने दिलेली कॅप्शन सध्या चर्चेत आहे. ''दुर्दैवाने जेव्हा आपण एखादा खेळ खेळत असतो, तेव्हा निश्चित खिलाडियोंका का खिलाडी गमावणे हे अपरिहार्य आहे,'' असे तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.

विशेष म्हणजे, हे कॅप्शन पती अक्षय कुमारसंदर्भातील आहे. ट्विंकल आणि अक्षय गार्डनमध्ये बुध्दीबळ खेळत असताना फोटोत दिसत आहेत. ट्विंकल काळ्या सोंगट्यानी खेळत असून अर्थात अक्षयकडे पांढऱ्या सोंगट्या आहेत. ट्विंकलसोबत तिची मुलगी नितारा आहे. या फोटोत ट्विंकलला अक्षय चेकमेट करताना दिसतो.

ट्विंकल आणि अक्षय कुमारची जोडी बॉलिवूडमध्ये बरीच चर्चेत राहणारी जोडी आहे. अक्षयवर नेहमी कुरघोडी करण्याची संधी ट्विंकल सोडत नाही. एका बाजूला अक्षय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान करीत असतो तर ट्विंकल नेहमी टीका टिपण्णी करीत असते. या पार्श्वभूमीवर बुध्दीबळात तिच्यावर मात केल्याचा हा फोटो बरंच काही सांगून जातो.

अक्षय कुमारचा आगामी सिनेमा मिशन मंगल १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. रोहित शेट्टीच्या सुर्यवंशी सिनेमात धमाकेदार स्टंट करताना अक्षय दिसणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.