हिंदी गाण्यांचा सदाबहार गायक किशोर कुमार यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा नाशिकात स्तुत्य उपक्रम पार पडला. नाशिक ऑर्केस्ट्रा असोसिएशनच्या वतीने मोस्ट वॉन्टेड किशोर कुमार या संगीतरजनीचे आयोजन परशुराम साईखेडकर नाट्यगृहात केले होते. यावेळी नाशिकर रसिकांनी किशोर कुमारांच्या गाण्यांवर ताल धरला.
नाशिकच्या उमद्या गायकांनी उत्तम सादरीकरण करुन रसिकांची मने जिंकली. "देखना हाय रे सोचना" "बाबू समझो इशारे" "जाने कैसे कब कहा इकरार हो गया" "सारा जमाना हसी नो का दिवाना" अशा गाण्यांवर नाशिककरांनी ताल धरला होता. अनेक गीतांना वन्स मोअरची डिमांड केली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना संधी मिळावी आणि किशोर कुमार यांना अभिवादन करावे हा उद्देश असल्याचे नाशिक ऑर्केस्ट्रा असोसिएशनने सांगितलं. यावेळी उमेश गायकवाड, फारूक पिरजादे,गोकुळ पाटील कमलेश शिंदे,मंदार पगारे,दीपक धात्रक श्रीनिवास सोनवणे,कांचन गोसावी,ज्योती केदारे,रवी शेट्टी उपस्थित होते.