ETV Bharat / sitara

Lockdown : अभिनयाशिवाय पंकज त्रिपाठी यांना या गोष्टीची आहे आवड - Pankaj Tripathi News

कोरोनामुळे जवळपास 1 आठवड्यापेक्षा जास्त काळापासून पंकज त्रिपाठी घरात वेळ घालवत आहेत.

Lcokdown Diaries Pankaj Tripathi Nurture writers in him
Lockdown : अभिनयाशिवाय पंकज त्रिपाठी यांना या गोष्टीची आहे आवड
author img

By

Published : Apr 2, 2020, 1:19 PM IST

मुंबई - अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. वेगवेगळ्या माध्यमांवर त्यांनी आपल्या अभिनयाची दमदार झलक दाखवली आहे. फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूड मध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांशिवाय डिजिटल व्यासपीठावर देखील त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात ते आणखी एका गोष्टीला वाव देत आहेत. याबाबतचा खुलासा त्यांनीच एका मुलाखतीत केला होता.

कोरोनामुळे जवळपास 1 आठवड्यापेक्षा जास्त काळापासून पंकज त्रिपाठी घरात वेळ घालवत आहेत. या काळामध्ये ते आपल्या लेखन शैलीला वाव देत आहेत. अभिनयाशिवाय त्यांना लिखाणाची प्रचंड आवड आहे. त्यांनी भूमिका साकारलेल्या काही प्रोजेक्टसाठी त्यांनी लिखाण केले आहे. लेखक प्रेक्षकांना काय सांगायचे आहे ते आपल्या देहबोली सोबतच आपण जे डायलॉग वापरतो त्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. लिखाण करणे ही माझी आवड आहे. त्यामुळे मला जे आवडतं ते मी लिहत असतो, असे त्यांनी सांगितले होते.

वर्कफ्रंट बाबत सांगायचं तर, पंकज त्रिपाठी हे अलीकडेच 'अंग्रेजी मिडीयम' चित्रपटात झळकले होते. आगामी काळामध्ये ते जान्हवी कपूर सोबत 'कारगिल गर्ल' मध्ये दिसणार आहेत. याशिवाय 'मीमी', 'लुडो' आणि '83' या चित्रपटात देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.