मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट 'लगान' ला आज २० वर्षे पूर्ण झाली आहेत. बॉक्स ऑफिसवर चमक दाखवण्याबरोबरच या चित्रपटाने ऑस्कर जिंकण्याच्या शर्यतीतही प्रवेश केला होता. चित्रपटाचा मुख्य अभिनेता आमिर खान म्हणतो की, '' 'लगान' बनवण्याचा अनुभव पुन्हा जगायची इच्छा नाही.''
आशुतोष गोवारीकर यांच्या दिग्दर्शनाविषयी सुपरस्टार आमिर खान म्हणतो, "जर तुम्ही मला 'लगान'चा रीमेक करण्यास सांगितले तर मी तो करणार नाही. लगान पुन्हा तयार करायची हौस माझ्यात नाही."

या चित्रपटाच्या निर्मितीचा अनुभव कदाचित परिपूर्णतेच्या जाणीवेबद्दल सांगत असतो. याशिवाय आमिर सहसा त्याने केलेल्या कोणत्याही कामाची पुनरावृत्ती करत नाही.
आज चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. बेस्ट फॉरेन फीचर फिल्म प्रकारात ऑस्करमध्ये भारतातर्फे हा चित्रपट तिसरा अधिकृत प्रवेश ठरला होता. आमिरने म्हटले आहे की या चित्रपटाशी संबंधित अनेक संस्मरणीय क्षण आहेत, त्यापैकी एखाद्याबद्दल सांगणे फार कठीण आहे.

त्याला क्रूर कॅप्टन रसेलची भूमिका बजावणारा पॉल ब्लॅकथॉर्न आठवतो. आमिरने म्हटले आहे की ऑफ कॅमेरा रसेल खूप नम्र होता, जो सेटवर असलेल्या प्रत्येकाला मजेशीर गोष्टी ऐकवायचा.
आमिर म्हणाला, "वास्तविक जीवनात खलनायकाची भूमिका साकारणारा पॉल ब्लॅकथॉर्न खूपच गोड आणि नम्र स्वभावाचा आहे. तो नेहमी हसायचा, लोकांना विनोद सांगायचा. आमच्याकडे एक मेक-अप रूम होती, तिथे पॉल आमच्या सर्वांचे मनोरंजन करायचा. दररोज सकाळी आम्ही सर्व मेक-अप वगैरे करून तयार व्हायचो. पॉलला बेटणे आमच्या सवयीचे बनले होते. त्याचे भरपूर किस्से आम्ही सर्वांनी ऐकले. आम्हाला खूप मजा आली. "

अजून एक किस्सा आठवत आमीर म्हणाला, "त्या दिवसात एक गोष्ट आमची सवय बनली होती. आम्ही बसमध्ये चढत होतो आणि सकाळी चार वाजता त्याठिकाणी पोहोचत होतो. सहा महिन्यांपर्यंत रोज गायत्री मंत्र म्हणणे आमच्या सवयीचे झाले होते. कुणीना कुणी तरी कलाकार याला स्पीकरवर ऑन करायचा. भोरच्या अंधारात रोज उठायच्या वेळी यामुळे आम्हाला उर्जा मिळत होती. एकदिवसही याशिवाय गेला नाही."
आमिर तसेच संपूर्ण युनिटसाठी लगान हा एक धडा ठरला आहे जो त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग राहील. हेच कारण आहे की तो अजूनही लगानच्या टीमशी संपर्कात आहे.
आमिर म्हणतो, “मी अजूनही इतर सर्व अभिनेत्यांसमवेत पॉल, राचेल शेली (ज्याने एलिझाबेथची भूमिका केली होती) यांच्या संपर्कात आहे. पाच महिन्यांपूर्वी आमचा स्वतःचा व्हॉट्सअॅप ग्रुप होता. त्यानंतर मी फोन वापरणे थांबवले, तेव्हापासून मी आता संपर्कात नाही."