ETV Bharat / sitara

ड्रग प्रकरणात धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितिज प्रसादला जामिन

author img

By

Published : Nov 26, 2020, 3:51 PM IST

बॉलिवूडच्या ड्रग सेवनाबाबत सुरू असलेल्या तपासातील आरोपी क्षितिज प्रसाद याला गेली काही आठवडे न्यायालयीन कोठडी मिळाली होती. क्षितिज प्रसाद हा धर्मा प्रॉडक्शनचा माजी कर्मचारी आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग सेवनाचा अँगल पुढे आला होता. यासंदर्भात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)ने त्याला २६ सप्टेंबर रोजी अटक केले होते.

Kshitij Prasad
क्षीतिज प्रसादला जामिन

मुंबई - निर्माता करण जोहरचा निकटवर्तीय तसेच धर्मा प्रोडक्शनमध्ये प्रमुख पदावर कार्यरत असलेल्या क्षितिज प्रसाद याला आज मुंबईतील स्पेशल एनडीपीएस न्यायालयाने कोर्टाने जामिनावर सुटका केली आहे. एनसीबीने त्याला ड्रग्स प्रकरणात अटक केली होती.

बॉलिवूडच्या ड्रग सेवनाबाबत सुरू असलेल्या तपासातील आरोपी क्षितिज प्रसाद याला गेली काही आठवडे न्यायालयीन कोठडी मिळाली होती. क्षितिज प्रसाद हा धर्मा प्रॉडक्शनचा माजी कर्मचारी आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग सेवनाचा अँगल पुढे आला होता. यासंदर्भात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)ने त्याला २६ सप्टेंबर रोजी अटक केले होते.

एनसीबीने दावा केला होता की, क्षितिज प्रसाद अनेक ड्रग सप्लायर्सच्या संपर्कात होता आणि तो स्वतःही ड्रग सेवन करीत होता. यामुळेच त्याला अटक झाली होती.

हेही वाचा - 'आश्रम' वेब सिरीजच्या तिसऱ्या सिझनची बॉबी देओलला प्रतीक्षा

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी तपास करत असलेल्या एनसीबीकडून (अमली पदार्थ नियंत्रक विभाग) गेल्या काही दिवसांपासून करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसादची चौकशी केली जात होती. या पथकाकडून क्षितिज प्रसादच्या मुंबईतील वर्सोवा, अंधेरी स्थित घरावर छापा सुद्धा मारण्यात आला होता. त्यानंतर क्षितिज प्रसादला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. क्षितिज प्रसाद याची चौकशी केल्यानंतर त्यास एनसीबीने अटक केली होती.

क्षितिज प्रसादच्या चौकशीत त्याने मान्य केले आहे, की त्याचे संबंध अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अंकुश अरेंजासोबत होते. क्षितिज प्रसादच्या मुंबईतील व दिल्लीतील घरी असलेल्या पार्ट्यांत अंकुश अरेंजा सुद्धा हजर राहायचा. एनसीबीने अंकुश अरेंजालाही अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अटक केली होती.

हेही वाचा - शाकाहारी भोजनामुळे फिट आणि निरोगी - मानुषी छिल्लर

सुशांतसिंह राजपूत हा 14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर अमली पदार्थ प्रकरण पुढे आले आहे. ड्रग्ज प्रकरणात काही ड्रग्ज पेडलरने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे आपले जबाब दिले. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेकांची नावे समोर आली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.