मुंबई - बॉलिवूड हंक हृतिक रोशन त्याच्या आगामी 'क्रिश ४' साठी सज्ज झाला आहे. क्रिश चित्रपटाच्या या चौथ्या भागामध्ये हृतिक चार वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात एक महिला सुपरहिरोही असणार आहे.
'क्रिश' चित्रपटाच्या अगोदरच्या भागांपेक्षा हा भाग अधिक आकर्षक करण्यासाठी हृतिकच्या चार भूमिका यात असतील. याबरोबरच चित्रपटाचे आकर्षण वाढण्यासाठी यात महिला सुपरहिरो असणार आहे.
![Hrithik Roshan will play four roles](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/lhj4oio9_400x400_1112newsroom_1607666404_435.jpg)
क्रिश ४ असणार भव्य दिव्य
या चित्रपटात मोठी भव्यता पाहायला मिळणार आहे. व्हीएफएक्सचा वापर भव्य दृष्यांसाठी केला जाणार आहे. हृतिकच्या चार भूमिका आणि महिला सुपरहीरो याशिवाय आणखी एक आकर्षण 'जादू'चे असणार आहे. 'जादु' आपल्याला 'क्रिश'च्या पहिल्या भागात 'कोई मिल गया' या चित्रपटात दिसला होता. तोच 'जादु' 'क्रिश ४' चे आकर्षण ठरू शकतो असा विचार निर्मात्याने केला असावा.
'क्रिश ४' हा चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शन अवस्थेत आहे. अद्याप कलाकारंची निवड झालेली नाही. कियारा अडवाणी या चित्रपटात असेल अशा चर्चा आहे. महिला सुपरहिरोच्या भूमिकेसाठी तिचा विचार होऊ शकतो.
हेही वाचा -कुणाल खेमूने बॉलिवूडमध्ये पूर्ण केली १५ वर्षे
क्रिश ४- एरियल अॅक्शन थ्रिलर
दरम्यान, हृतिकने आपल्या आगामी चित्रपटासाठी 'वॉर' चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्याशी हातमिळवणी केली असून या चित्रपटाचे नाव आहे 'फाइटर'. एरियल अॅक्शन थ्रिलर म्हणून या चित्रपटाचा विचार होत आहे.
हेही वाचा -कंगनाच्या ‘धाकड’ चित्रपटाचे शूटिंग सातपुड्यात होणार