ETV Bharat / sitara

'इम्रान'सोबत कंगना डेट करीत असल्याचा केआरकेचा दावा... म्हणतो, "हा तर लव्ह जिहाद" - केआरकेबद्दलच्या काही रंजक गोष्टी

अभिनेता कमल रशीद खान उर्फ ​​केआरकेला वादाचा मोठा इतिहास आहे. अलीकडेच त्याने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक ट्विट केले आहे. त्याचे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

KRK claims that Kangana is dating 'Imran'
'इम्रान'सोबत कंगना डेट करीत असल्याचा केआरकेचा दावा
author img

By

Published : Aug 18, 2021, 5:23 PM IST

मुंबई - केआरके म्हणून प्रसिद्ध असलेला कमल आर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ​​केआरके सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो सतत वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करतो, बऱ्याचदा वादात राहण्यासाठीही तो ओळखला जातो. अलिकडेच त्याने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक ट्विट केले आणि नंतर लगेचच त्याने ते हटवले. हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात...

खरंतर, केआरकेने KRK ने कंगना रणौतसाठी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्याने कंगना रणौतचे दोन फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ''ब्रेकिंग न्यूज - कंगना रणौत इम्रान नावाच्या इजिप्शियन (Egyptian) मुलाला डेट करत आहे, हा लव्ह जिहाद आहे, दीदी तुझ्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती.''

'इम्रान'सोबत कंगना डेट करीत असल्याचा केआरकेचा दावा
'इम्रान'सोबत कंगना डेट करीत असल्याचा केआरकेचा दावा

त्यानंतर केआरकेचे हे ट्वीट सोशल मीडियावर वाऱ्यासारखे वेगाने पसरले. यावर अनेक युजर्सनी कंगनाचे समर्थन केले. मात्र, काही वेळातच केआरकेने त्याचे ट्विट डिलीट केले. त्यानंतर केआरकेच्या ट्विटचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यावर अद्याप कंगनाने आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

विशेष म्हणजे जुलै महिन्यात कंगना रणौतने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यामध्ये कंगनासोबत जो व्यक्ती दिसत आहे तोच इम्रान असल्याचे सांगितले जात आहे. खरंतर पोस्टमध्ये कंगनाने त्या व्यक्तीचे नाव रिझवान असल्याचे म्हटले होते. रिझवानच्या वाढदिवसाला कंगनाने ही पोस्ट केली होती आणि त्याचे खूप कौतुक केले होते.

या प्रकरणाची माहिती मिळताच कंगना रणौतचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी एक ट्विट केले. यात त्यांनी अशा अफवा पसरवण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आणि ही बातमी सरळ सरळ फेटाळून सावली.

वादग्रस्त केआरके

केआरकेने असे ट्विट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. केआरकेचा वादांशी दूरपासूनचा संबंध आहे, तो अनेकदा अशी ट्वीट करतो, ज्यामुळे तो बातम्यांच्या मथळ्यांमध्ये येतो. कंगनाही काही कमी वादग्रस्त नाही. तिही सोशल मीडियावर आपली मते मांडत असते आणि त्यातून वाद औढवून घेत असते.

कमल आर खान याने देशद्रोही चित्रपटातून अभिनेता-निर्माता म्हणून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यानंतर तो मोहित सुरी दिग्दर्शित एक व्हिलन चित्रपटात दिसला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती, तसेच 2014 या वर्षाच्या हिट चित्रपटांच्या यादीत त्याचा समावेश होता. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि श्रद्धा कपूर, रितेश देशमुख या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते.

केआरकेची टीव्ही कारकिर्द

केआरकेची फिल्मी कारकीर्द अपयशी ठरली, तशीच त्याची टीव्ही कारकीर्दही. त्याने टीव्ही करिअरची सुरुवात कलर्सचा बहुचर्चित रिअॅलिटी शो बिग बॉसपासून केली. या शोमध्ये तो त्याच्या वागण्यामुळे काही दिवसच टिकू शकला. बिग बॉसमध्ये तो स्वतःला अमिताभ-शाहरुखपेक्षा अधिक श्रीमंत म्हणवताना दिसला. आपले घर 2100 स्क्वेअर फुटाचे असून घरी हॉलंडमधून दूध, फ्रान्समधून पाणी आणि लंडनमधून चहा येत असतो असा थापा तो मारत होता.

केआरकेबद्दलच्या काही रंजक गोष्टी

कमाल आर खानचे पूर्ण नाव कमल रशीद खान आहे.

कमल रशीद खान त्याच्या घरातून पळून जाऊन मुंबईत अभिनेता होण्यासाठी आला होता. पण तो हिंदी चित्रपटसृष्टीत अयशस्वी ठरला. त्यानंतर त्याने आपला कल भोजपुरी चित्रपटांकडे वळवला.

कमाल रशीद खान अनेकदा त्याच्या आक्षेपार्ह ट्विट्समुळे वर्तमानपत्र आणि टीव्हीच्या मथळ्यांमध्ये राहतो.

कलर्सच्या बहुचर्चित रिअॅलिटी शो बिग बॉस दरम्यान, त्याने स्वतःला शोमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून सांगितले होते आणि श्रीमंती थाटाच्या भरपूर थापा मारल्या होत्या.

हेही वाचा - तालिबानी दहशतवाद्यांची तुलना हिंदुत्ववाद्यांशी, नेटकरी संतापले, म्हणाले स्वरा भास्करला अटक करा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.