ETV Bharat / sitara

क्रिती सॅनॉनने फॅन्सना ‘डियर डायरी’ म्हणत मोकळे केले आपले मन!

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन सुद्धा म्हणते की, ‘या कठीण काळात आपल्या मनातील विचार मनातच राहतात कारण व्यक्त होण्यासाठी समोर कुणीच नाही. हा काळ जरी आपल्याला मोडणारा असला तरीही तो जोडणारा पण आहे.’ क्रितीने समाज माध्यमावर व्हिडीओ पोस्ट करत आपले मनोगत फॅन्ससोबत शेयर केले, त्यांना आपली ‘डिअर डायरी’ बनवत.

author img

By

Published : May 8, 2021, 10:48 PM IST

kriti-senon
क्रिती सॅनॉन

सध्याच्या कोरोना परिस्थितीत मानसिक आरोग्याची काळजी घेण्याला प्राथमिकता आलेली आहे. मन खंबीर असेल तर कुठल्याही शारीरिक व्याधीवर विजय मिळवता येतो असं बडेबुजुर्ग सांगतात. मनोरंजनसृष्टीत तर मानसिक खच्चीकरण जास्त प्रमाणात होते असे म्हटले जाते. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन सुद्धा म्हणते की, ‘या कठीण काळात आपल्या मनातील विचार मनातच राहतात कारण व्यक्त होण्यासाठी समोर कुणीच नाही. हा काळ जरी आपल्याला मोडणारा असला तरीही तो जोडणारा पण आहे.’ क्रितीने समाज माध्यमावर व्हिडीओ पोस्ट करत आपले मनोगत फॅन्ससोबत शेयर केले, त्यांना आपली ‘डिअर डायरी’ बनवत.

क्रिती सेनॉनने फॅन्ससोबत मोकळे केले मन

क्रितीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ सामायिक केला आणि आपल्या फॅन्स बरोबर भावनिक संवाद साधला. “मी प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगले शोधण्याचा प्रयत्न करते. परिस्थिती चांगली, वाईट कशीही असो मला अंधाऱ्या बोगद्यातून प्रकाशाचा किरण दिसत असतो. वाईट गोष्टीतही चांगले शोधायचा प्रयत्न करते, अशी मी व्यक्ती आहे. 💁🏻‍♀️

मैं और मेरी तनहाई अक्सर बातें किया करते हैं .. 👀
झोपायला जाण्याआधी माझ्या मनातील विचार तुमच्यासमोर ठेवावेसे वाटले. मनापासून धन्यवाद आज रात्री माझी ‘डिअर डायरी’ झाल्याबद्दल. या कठीण प्रसंगात आपण सर्व एकत्रच आहोत हे ध्यानात असू द्या. #WeAreInThisTogether 💖 "

क्रिती सेनॉन बॉलिवूडची एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्याकडे बरेच चित्रपट असून आगामी काळात ती विभिन्न जॉनरच्या चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर येईल. दुसरा लॉकडाऊन लागण्याअगोदर नुकतेच तिने वरुण धवन सोबत हॉरर कॉमेडी ‘भेडिया’ चे शूट संपविले. क्रिती ‘आदिपुरुष’ मध्ये प्रभास सोबत काम करीत असून ती सीतेच्या भूमिकेत दिसेल. त्याचबरोबर क्रिती अभिनित मिमी, बच्चन पांडे, गणपत, हम दो हमारा दो हे चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर जातील. साहजिकच तिचे चाहते तिच्या चित्रपटांच्या प्रतीक्षेत आहेत.

लक्षण उतेकर दिग्दर्शित ‘मला आई व्हायचंय’ वर आधारित ‘मिमी’ मध्ये क्रितीसोबत मराठमोळी सई ताम्हणकर दिसणार असून हा चित्रपट कदाचित ओटीटी माध्यमावर लवकरच प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा - नागपूरहून हैदराबादला एअरलिफ्ट केलेल्या भारतीचे निधन, सोनूने वाहिली श्रध्दांजली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.