मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन अलीकडेच 'मिमी' चित्रपटात दिसली होती. 'मिमी' हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आणि प्रेक्षकांना तो खूप आवडला. या चित्रपटातील व्यक्तीरेखेचे गरज ओळखून तिने आपले वजन 15 किलोनी वाढवले होते. हे वजन कमी करण्यासाठी तिला तितकीच मेहनत घ्यावी वागली.
व्यक्तीरेखा
चित्रपटात क्रितीने सरोगसी आईची भूमिका साकारली होती. क्रितीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. क्रितीसोबतच दिग्गज कलाकार पंकज त्रिपाठी यांनीही चित्रपटात भरपूर रंगत आणली.
क्रिती सेनॉनने वाढवले होते वजन
चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना वाटत होते की क्रितीचा गर्भवती महिलेसारखा चेहरा दिसावा. यासाठी तिला सेटवर भरपूर खाऊ घातले. मग काय तिने विविध खाद्य पदार्थांवर भरपूर ताव मारला आणि तीन महिन्यात तिचे 15 किले वजन वाढले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
क्रिती पुन्हा कशी झाली फिट?
चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर क्रिती तिच्या फिटनेस गुरुंकडे वळली आणि तिने 15 किलो वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. या संदर्भात क्रितीने एक व्हिडिओ इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केला आहे.
क्रिती सेनॉनने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. आपले वाढलेले वजन घटवण्यासाठी तिने जिममध्ये भरपूर मेहनत केलेली दिसते. या अथक प्रयत्नामुळे ती आपले 15 किलो वजन घटवू शकली आणि पूर्वपदावर आली.
क्रिती सेनॉनचे आगामी चित्रपट
क्रिती सॅनन आता तिचा डेब्यू को-स्टार टायगर श्रॉफसोबत 'गणपत' चित्रपटात दिसणार आहे. तसेच, ती सुपरस्टार प्रभाससोबत 'आदिपुरुष' चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा - शाहरुखच्या संडे नाईट पार्टीत बॉलिवूड स्टार्ससह अदर पूनावाला