ETV Bharat / sitara

केजीएफ स्टार यशने कोरोनामुळे रद्द केले बर्थ डे सेलेब्रिशन - कन्नड अभिनेता यशाच्या शिखरावर

केजीएफ: चॅप्टर १ या २०१८ मध्ये आलेल्या चित्रपटामुळे कन्नड अभिनेता यशाच्या शिखरावर पोहोचला. त्याचा ३५ वा वाढदिवस असून कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करु नये असे आवाहन त्याने आपल्या चाहत्यांना केले आहे.

Yash
यश
author img

By

Published : Jan 8, 2021, 5:09 PM IST

मुंबई - सुपरस्टार यशचा आज ३५ वा वाढदिवस साजरा होत आहे. यासाठी देशभर असलेले त्याचे चाहते बंगळूरमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यांना हा वाढदिवस जल्लोषात साजरा करायचा आहे. या चाहत्यांसाठी यशने सोशल मीडियावरुन आवाहन केले आहे.

''हे वर्ष आपण साधेपणाने घालवत आहोत. तुम्हा सर्वांना माहिती आहे की, कोरोना व्हायरसच्या उद्रेक होऊ शकतो त्यामुळे आपण बाहेर जमा होत नाही. साधारणपणे सेलेब्रेशन घरी होत असते, परंतु यावेळी मी बाहेर आलो आहे.'', असे अभिनेता यशने सांगितले.

यशने प्राणघातक कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी टिप्सही दिल्या. "वैयक्तिक स्वच्छता ठेवा. आम्हाला माहिती आहे की हातमिळवणीपेक्षा 'नमस्ते' चांगले आहे. जर तुम्हाला बरे वाटत नसेल तर कृपया डॉक्टरांना भेटा. सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा,'' असे त्याने पुढे म्हटलंय.

यश केजीएफच्या आगामी दुसर्‍या चॅप्टरमध्ये दिसणार आहे, बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि रवीना टंडन यांच्याही या सीक्वेल चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. केजीएफ-२ चा बहुप्रतिक्षित ट्रेलर शुक्रवार ऐवजी एकदिवस अगोदरच गुरुवारी रिलीज करण्यात आला.

हेही वाचा -"माझा छळ का होतोय? मला देशाकडून उत्तर हवंय", कंगनाचे जनतेला आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.