‘कौन बनेगा करोडपती’ हा खेळवजा मनोरंजक आणि ज्ञान वाढविणारा कार्यक्रम प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीचा आहे कारण त्यात समाजातील कुठल्याही व्यक्तीला आपल्या ज्ञानाच्या जोरावर यात भाग घेतला येतो आणि बरीच मोठी राशी जिंकता येते जी त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करते. यावर्षी ‘कौन बनेगा करोडपती’ चा १३ वा हंगाम २३ ऑगस्ट २०२१ सुरु झाला असून लगेचच यावर्षीची पहिली करोडपती व्यक्ती लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. हिमानी बुंदेला ही महिला दृष्टिहीन असून तिने या सीझनचा पहिला करोडपती होण्याचा मान पटकावला आहे. इतकेच नव्हे तर या खेळातील शेवटच्या प्रश्नाबाबतीतही ती कॉन्फिडन्ट दिसत असून ती ७ कोटी सुद्धा मिळवू शकेल असे वाटतेय.
अमिताभ बच्चन सूत्रसंचालित करीत असलेला ‘कौन बनेगा करोडपती १३’ चा प्रीमियर २३ ऑगस्ट रोजी झाला. या शोच्या प्रोमोमध्ये दृष्टिहीन स्पर्धक हिमानी बुंदेला हॉट सीटवर दिसत आहे, तिने १ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले असून ती ७ कोटी रुपयांच्या अंतिम प्रश्नाला सामोरे जाताना दिसत आहे. हिमानी आग्रा येथील शिक्षिका आहे. तिच्यासोबत तिचे वडिल या शोमध्ये हजेरी लावून आहेत आणि त्यांनी असे सांगितले की, त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हिमानी बद्दल नितांत आदर आहे आणि अभिमान पण आहे.
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने एक प्रोमो शेअर केला असून त्यात लिहिले आहे की, “खूशमीजाज स्वभाव से अपनी जिंदगी जीने वाली एक दृष्टीहिन कंटेस्टंट, हिमानी बुंदेला केबीसी 13 की पहिली करोडपती बन गयी है. पर क्या वो दे पायेगी 7 करोड के सवाल का सही जवाब? जानने के लिए देखीए कौन बनेगा करोडपती, 30-31 ऑगस्ट रात 9 बजे, सिर्फ सोनी पर.”
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दृष्टिहीन महिला हिमानी बुंदेला, जी शिक्षकसुद्धा आहे, हिने ‘कौन बनेगा करोडपती १३’ ची पहिली करोडपती बनण्याचा मान संपादन केला असून आता ती ७ कोटी जिंकते की नाही याबाबत प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे.
हेही वाचा - राम गोपाल वर्माचे अभिनेत्रींना कवटाळत डान्स करतानाचे दोन व्हिडिओ व्हायरल!