ETV Bharat / sitara

'सूर्यवंशी'च्या पोस्टरवर झळकली कॅटरिना कैफ, पाहा नवं पोस्टर - Sooryavanshi news

कॅटरिना कैफने 'सूर्यवंशी' चित्रपटाचे हे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

new poster of film Sooryavanshi, Sooryavanshi poster, Akshay Kumar look on Sooryavanshi poster, Katrina Kaif look on Sooryavanshi poster, Rohit Shetty's cop universe, Sooryavanshi news, Sooryavanshi latest update
'सूर्यवंशी'च्या पोस्टरवर झळकली कॅटरिना कैफ, पाहा नवं पोस्टर
author img

By

Published : Mar 6, 2020, 9:46 AM IST

मुंबई - बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरनंतर आता चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. अक्षय कुमारसोबत अजय देवगन, रणवीर सिंग आणि कॅटरिना कैफ यांचीही झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. आता कॅटरिना आणि अक्षयचा एकत्र लुक असलेलं 'सूर्यवंशी'चं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

कॅटरिना कैफने 'सूर्यवंशी' चित्रपटाचे हे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

'सूर्यवंशी' चित्रपटात अक्षय आणि कॅटरिनावर चित्रीत झालेले 'टीप टीप बरसा पानी' हे गाणं देखील पाहायला मिळणार आहे. या गाण्याचाही प्रेक्षकांना आतुरता आहे.

हेही वाचा -'...तर गाण्यात दारूचा उल्लेख करणार नाही' - हनी सिंग

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधला हा चौथा चित्रपट आहे. 'सूर्यवंशी'च्या मदतीला धावून येण्यासाठी अजय देवगन 'सिंघम'च्या रुपात तर, रणवीर सिंग 'सिंबा'च्या रुपात चित्रपटात दिसणार आहे. या तिघांचीही दमदार एन्ट्री ट्रेलरमध्ये दिसली आहे.

अभिनेता जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोवर आणि सिकंदर खेर यांचीही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे. २४ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा - राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाकेच्या विधानामुळे चर्चेला उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.