मुंबई - अली अब्बास जफर यांचं दिग्दर्शन असलेला 'भारत' चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा कॅटरिना आणि सलमानची ऑनस्क्रीन जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. कॅटरिनाने नुकतेच चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत.
सीन शूट करण्याआधीचा चित्रपटाच्या सेटवरील हा फोटो आहे. यात कॅटरिना आपल्या मॅडम जीच्या लूकमध्ये दिसत आहे. तर सलमान आपल्या सीनसाठी टच अप करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत कॅटरिनाचा क्लोजअप फोटो पाहायला मिळत असून तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे.
पडद्यामागील सलमान आणि कॅटरिनाचे हे फोटो त्यांच्या चाहत्यांच्या नक्कीच पसंतीस उतरतील, यात शंका नाही. या चित्रपटात सलमान आणि कॅटरिनाशिवाय सुनील ग्रोवर आणि दिशा पटानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या ५ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.