हैदराबाद - 2021 वर्षा निरोप देण्यात बॉलिवूड सेलेब्रिटी गुंतलेले असताना अभिनेत्री कॅटरिना कैफने २०२१ ला अनोख्या पध्दतीने बाय बाय केले आहे. तिने या वर्षातील शेवटचा वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे. कॅटरिनाच्या चाहत्यांची या व्हिडिओला प्रचंड पसंती मिळत आहे. लग्नानंतर कॅटरिनाने शेअर केलेला हा पहिला व्हिडिओ आहे.
वर्षाच्या शेवटच्या दिवशी स्टार्स त्यांचे शेवटचे क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात. कियारा अडवाणी आणि करीना कपूरनंतर आता कॅटरिना कैफनेही सोशल मीडियावर 2021 च्या शेवटच्या क्षणाचा उल्लेख केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या व्हिडिओमध्ये कॅटरिनाने गुलाबी आणि काळ्या रंगाचे जिम वेअर परिधान केले आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना कॅटरिनाने लिहिले की, 'वर्षातील शेवटचा वर्कआउट'. यासोबत तिने डान्सिंग आणि स्टार इमोजी बनवले आहेत.
कॅटरिना कैफ आता विवाहित आहे आणि लग्नानंतर ती स्वतःची विशेष काळजी घेत आहे. तिला सासरच्या मंडळींसाठी वेळ काढावा लागतो. दरम्यान कॅटरिनाचा पती विकी कौशल इंदूरमध्ये त्याच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच, तो सारा अली खानला बाईकवर बससवून फिरताना दिसला होता. तो एक शूटिंग सीन होता, जो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कॅटरिना कैफ दिग्दर्शक श्रीराम राघवनसोबत तिचा आगामी चित्रपट 'मेरी ख्रिसमस' करत आहे. यावर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने कतरिनानेही एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती चित्रपटाच्या मुहूर्ताचे शूटिंग करताना दिसली होती. या चित्रपटात कॅटरिना कैफ दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. त्याचबरोबर कॅटरिना कैफ सलमान खानसोबत 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचा - 'हिरोपंती 2'च्या शुटिंगला सुरुवात, टायगरसोबत रोमान्स करताना दिसणार तारा सुतारिया