मुंबई - बॉलिवूडची 'चिकनी चमेली' कॅटरिना कैफ (Katrina kaif) आणि अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal) यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे. कॅटरिना कैफ ही वय आणि कमाईमध्ये विकी कौशलपेक्षा पुढे आहे. अशा परिस्थितीत, आम्ही कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या कमाई आणि एकूण संपत्तीबद्दल (Katrina kaif and Vicky Kaushal net worth) तुम्हाला माहिती देत आहोत..
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कॅटरिनाचा स्टारडम
कॅटरिना चित्रपटांव्यतिरिक्त आलिशान आणि विलासी जीवन जगते. कॅटरिना तिच्या सात बहिणींमध्ये सर्वाधिक कमाई करणारी मुलगी आहे. कॅटरिना बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे आणि जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर ती एका चित्रपटासाठी 10 ते 11 कोटी रुपये मानधन घेते. कॅटरिनाने एकदा नव्हे तर पाच वेळा 'वर्ल्ड सेक्सीस्ट वुमन'चा किताब पटकावला आहे.
कॅटरिनाची कमाई
त्याचवेळी, फोर्ब्स मासिकानुसार, 2017 पासून सलग तीन वर्षे जगभरातील 100 सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये कॅटरिना कैफचाही समावेश करण्यात आला आहे. 2019 मध्ये ती 23 व्या क्रमांकावर होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅटरिना कैफची वार्षिक कमाई 23.64 कोटी रुपये आहे. कॅटरिना एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी ६ ते ७ कोटी रुपये घेते. एकूणच, कॅटरिना कैफकडे 220 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
विकीची मिळकत
त्याचवेळी विकी कौशलच्या कमाईचा विचार केला तर तो कॅटरिनासमोर फिका दिसतो, पण विकीने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावले आहे. विकीने राष्ट्रीय पुरस्कारही आपल्या नावावर केला आहे. विकी एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी रुपये घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2019 मध्ये फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 सेलिब्रिटींमध्ये विकी कौशलचाही समावेश करण्यात आला होता. त्यांची एकूण संपत्ती $3 मिलियन म्हणजेच जवळपास 22 कोटी रुपये आहे.
'वि-कॅट'चे लग्न
कॅटरिनाचे नाव जोडले ग्लायनंतर विकी कौशलची मार्केट व्हॅल्यू आणखी वाढताना दिसत आहे. तो रोजच चर्चेत असतो. कॅटरिनाला विकी कौशलचा आत्मविश्वास आणि विनोदबुद्धी आवडल्याचे सांगितले जात आहे. विकीने अनेक प्रसंगी कॅटरिनासमोर आपले मन मोकळे केले आहे.
अशा परिस्थितीत कॅटरिनाला विकीमध्ये परफेक्ट नवऱ्याची झलकही पाहायला मिळते. आता बातमी आहे की, आठवडाभरातच दोघेही कायमचे एकत्र राहणार आहेत.
हेही वाचा - Arya Second Season : राम माधवानी दिग्दर्शित 'आर्या २’मध्ये जबरदस्त भूमिकेत सुष्मिता सेन