मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली आहे. १९८० ते १९९० च्या दरम्यान काश्मिरमध्ये दहशतवादी संघटनांकडून झालेले पंडितांवर आत्याचार ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटातून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दाखवले आहे. आतापर्यंत कर्नाटकसह, गोवा, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश या राज्यांत हा चित्रपट करमुक्त केला आहे. आता महाराष्ट्रातही हा चित्रपट करण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहीले पत्र दरम्यान आता भाजप नेते महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली आहे. दरम्यान भाजप नेते नितेश राणे यांनीही मुख्यमंत्र्यांकडे यासाठी मागणी केली आहे. “जम्मू काश्मीरमध्ये मुस्लिम दहशतवाद्यांनी हिंदूंवर अनन्वित आत्याचार केले. या गोष्टीचे योग्य आणि खरे चित्रिकरण या चित्रपटात केलं आहे, म्हणून हा चित्रपट सरकारने करमुक्त करावा. ‘द काश्मिर फाईल्स’ हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेने अधिकाधिक पहावा यासाठी सरकारने हा चित्रपट करमुक्त करावा”, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. दरम्यान हा चित्रपट विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे. झी स्टुडिओ आणि अभिषेक अग्रवाल आर्टस् हे निर्माते आहेत. त्याचबरोबर मुख्य भूमिकेत अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी हे आहेत.
हेही वाचा - 'द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील इतिहास खोटा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची टीका