ETV Bharat / sitara

कार्तिक-यामीसह असंख्य सेलेब्स झाले 'आय स्टँड विद ह्यूमॅनिटी'मध्ये सामील

author img

By

Published : Mar 27, 2020, 2:36 PM IST

अनेक बॉलिवूड सेलेब्सनी 'आय स्टँड विद ह्यूमॅनिटी' या नावाने पुढाकार घेत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यात आता कार्तिक आर्यन, मेघना गुलजार आणि यामी गौतम सहभागी झाले आहेत.

-I-STAND-WITH-HUMANITY-INITIATIVE
आय स्टँड विद ह्यूमॅनिटी

मुंबई - २१ दिवस चालणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना अन्न धान्य आणि अत्यवश्यक वस्तु देण्याचा निर्धार बॉलिवूड सेलेब्सनी केला आहे. यासाठी 'आय स्टँड विद ह्यूमॅनिटी' या नावाने एक ऑर्गनायझेशन स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसह कार्तिक आर्यन, मेघना गुलजार आणि यामी गौतम सहभागी झाल्या आहेत.

याबद्दलची माहिती देताना कार्तिक आयर्नने ट्विटरवर लिहिलंय, ''आम्ही एक दुसऱ्यांसाठी करणार नाही तर कोण करणार ? समर्थन करा आणि देणगी द्या.''

'छपाक' दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनीही आपल्या भावासोबत आवाहन केले आहे. आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, ''प्रयत्न करण्याची ही वेळ आहे. आपण जे आहोत त्याचे आभार मानण्याची ही वेळ आहे. ज्यांच्याकडे साधनं नाहीत त्यांची आपण मदत करु शकतो हे लक्षात घ्या. प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे.''

अभिनेत्री यामी गौतमनेही इन्स्टाग्रामवरुन आवाहन करीत लिहिलंय, ''मी मनापासून या महत्त्वाच्या पुढाकाराचे समर्थन करते. या मानवी कामाचा हिस्सा बनून मी खूश आहे. घरात बसून सुरक्षित राहण्यासोबतच लोकांना यात योगदान देण्याचे आवाहन करीत आहे.''

याबरोबरच अभिनेत्री कृती खरबंदा आणि बोमन इराणी यांनीही यात सहभागी होत असल्याचे सोशल मीडियावरुन कळवले आहे. यापूर्वी 'आय स्टँड विद ह्यूमॅनिटी' च्या मार्फत लोकांना मदत करणाऱ्यांचा यादीत करण जौहर, राजकुमार हिरानी, तापसी पन्नू, आयुष्मान खुराना, लारा दत्ता, संजय दत्त, जैकी श्रॉफ, कियारा आडवाणी, रकुल प्रीत सिंह आणि भूमि पेडनेकर यांचाही समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.