ETV Bharat / sitara

कार्तिक आर्यनने करुन दिली 'धमाका'मधील अर्जुन पाठकची ओळख - कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट

अभिनेता कार्तिक आर्यनने धमाका चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटातील व्यक्तीरेखेचा लूक कार्तिकने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर राम माधवानी दिग्दर्शित थ्रिलरमध्ये अर्जुन पाठक ही व्यक्तीरेखा साकारत आहे.

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन
author img

By

Published : Dec 21, 2020, 1:15 PM IST

मुंबई - बॉलिवूड हार्टथ्रॉब कार्तिक आर्यनने आपल्या आगामी ‘धमाका’ चित्रपटातील व्यक्तीरेखेचा लूक प्रसिध्द केला आहे. या चित्रपटात तो साकारत असलेल्या पात्राच्या नावाचा खुलासाही त्याने केलाय.

कार्तिकरने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करुन धमाका चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेचे नाव चाहत्यांना कळवले आहे. त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''भेटा अर्जुन पाठकला.''

Dhamaka look
कार्तिक आर्यनचा धमाका लूक

या फोटोमध्ये कार्तिकने निळ्या रंगाचा कोट परिधान केला असून त्यावर तो ज्या वृत्त वाहिनीसाठी काम करतोय त्याचे नाव दिसतंय. त्याच्या शर्टवर रक्ताचे शिंतोडे उडाल्याचे दिसते. या चित्रपटात तो मुंबईवरील दहशत हल्ल्याचे रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराची भूमिका साकारत आहे.

आपल्या कारकीर्दीतील पहिल्याच थ्रिलरमध्ये सहभाग घेण्यासाठी तो किती उत्साही आहे याविषयी बोलताना कार्तिकने पूर्वी सांगितले होते की, "ही माझ्यासाठी एक चमत्कारिक पटकथा आहे आणि कथा ऐकताना मी जागेवरुन हललो नव्हतो. एक कलाकार म्हणून माझी वेगळी बाजू दाखवण्याची संधी मला या कथेमुळे मिळाली आहे. "

हेही वाचा - तेलंगणामध्ये उभारले 'सोनू सूद'चे मंदिर!

रॉनी स्क्रूवाला आणि आर.एस.वी.पी. सहनिर्माते अमिता माधवानी यांच्यासह राम माधवानी फिल्म्स निर्मित हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधणारा ठरु शकतो.

हेही वाचा - कार्तिक आर्यन २० दिवसात पूर्ण करणार 'धमाका'चे शुटिंग!!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.