मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन याला आपल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य कसे आणता येईल हे माहित आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करण्यापूर्वी त्याने संध्याकाळी 4 वाजता एक मजेदार पोस्ट केली.
त्याने एक फोटो अपलोड केला ज्यात त्याची आई त्याला चमच्याने खाऊ घालताना दिसते. हे एक चमचे दही-साखरेसारखे दिसत होते, जे भारतीय काही महत्त्वाचे करण्याआधी शुभ खाणे मानतात. कार्तिक यांच्या कॅप्शनमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण पाहण्यासाठी दही-साखरेचा चमचा असल्याचे संकेत दिले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
“मोदीजींच्या देशाला संबोधण्यासाठीची तयारी केली” असे कार्तिकने लिहिले आहे.
कार्तिकच्या या फोटोला नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिलाय. अनेक प्रतिक्रियांचा पाऊस पडल्याचे दिसत आहे.
हेही वाचा - आषाढी वारीनिमित्त संकर्षण कऱ्हाडे विचारतोय 'पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं हाय का..?'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केले की, त्यांचे सरकार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देईल. ज्या अंतर्गत गरीब आणि गरजू लोकांना धान्य दिले जात आहे.