ETV Bharat / sitara

कार्तिक आर्यनच्या आगामी-यादीत 'शहजादा'ची पडली भर, शूटिंग सुरु! - कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट

आगामी चित्रपट 'धमाका'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज केल्यानंतर, कार्तिक आर्यनने आता 'शहजादा'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. कार्तिकचे व्यावसायिक वेळापत्रक व्यग्र असून तो आता एका पाटोपाठ एका चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

'शहजादा' चे शूटिंग सुरु
'शहजादा' चे शूटिंग सुरु
author img

By

Published : Nov 2, 2021, 10:06 PM IST

लॉकडाऊनच्या काळात आपल्या फॅन्सच्या जास्तीत जास्त संपर्कात असणाऱ्या कलाकारांमध्ये कार्तिक आर्यन आघाडीवर होता. तसेच काही महिन्यांपूर्वी काही चित्रपटांतून बाहेर पडण्यासाठी कार्तिक आर्यन न्यूजमध्ये होता. परंतु आता कोरोना संकट निवळल्यावर काही दिवसांपूर्वीच कार्तिकने त्याचा आगामी चित्रपट ‘शहजादा' च्या चित्रीकरणास प्रारंभ केला आहे. आपला आगामी चित्रपट 'धमाका'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज केल्यानंतर, कार्तिक आर्यनने आता 'शहजादा'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

'शहजादा' चे शूटिंग सुरु
'शहजादा' चे शूटिंग सुरु

कार्तिकचे व्यावसायिक वेळापत्रक व्यग्र असून तो आता एका पाटोपाठ एका चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. तो सध्या बॅक टू बॅक प्रोजेक्ट्सच्या घोषणा आणि शूटिंग शेड्यूलमध्ये अतिशय व्यस्त आहे. ‘शहजादा' च्या चित्रीकरणास प्रारंभ केल्यावर त्याने आपल्या इंस्टाग्रामवर क्लैपर फोटो शेअर करताना लिहिले होते की, " #शहजादा सुरू"

'शहजादा' चे शूटिंग सुरु
'शहजादा' चे शूटिंग सुरु

कार्तिक आर्यन अथकपणे आपल्या शूटिंग शेड्यूलवर काम करताना दिसतोय. तो बराच बिझी असून शूटिंग, चित्रपट प्रमोशन, लॉन्च इवेंट ई मध्ये व्यग्र आहे. कार्तिक आर्यन आपला आगामी चित्रपट 'शहजादा'मध्ये पहिल्यांदाच दिग्दर्शक रोहित धवनसोबत काम करत आहे. कार्तिककडे आगामी चित्रपटांची भली मोठी रांग आहे. 'धमाका', 'भूल भुलैया २', अलाया एफसोबत 'फ्रेडी' यासोबतच आता कार्तिकच्या आगामी-यादीत 'शहजादा' ची सुद्धा भर पडली आहे.

'शहजादा' चे शूटिंग सुरु झाले असून तो पुढील वर्षी ४ नोव्हेंबर ला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पडणारे ‘झिम्मा'चे ‘माझे गाव' गाणे!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.