सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच 'शेरशाह' या आगामी चित्रपटात कारगिल नायक विक्रम बत्राच्या भूमिकेत दिसणार आहे. शहीद बत्रा यांच्या कोडनेमवरून शीर्षक असलेल्या या चित्रपटात कियारा अडवाणी हिने डिंपल चीमा ही व्यक्तीरेखा साकारली आहे.
धर्मा प्रोडक्शन्सच्या मार्फत बनलेल्या 'शेरशाह' या चित्रपटाचा ट्रेलर रविवारी लाँच झाला. या कार्यक्रमास चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, उत्तर आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाई के जोशी, चित्रपट निर्माते करण जोहर, अपूर्व मेहता आणि कारगिल युद्धातील दिग्गजांचे कुटुंबीय, अनेक सैनिक आणि अधिकारी उपस्थित होते.
-
Captain Vikram Batra reporting on duty!
— Sidharth Malhotra (@SidMalhotra) July 25, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The wait is finally over, I’m honoured to present to you the legendary story of our Kargil War Hero. https://t.co/A1Q8voZTzz#ShershaahOnPrime releases on 12th August. Jai Hind🇮🇳#Shershaah @advani_kiara @vishnu_dir @karanjohar
">Captain Vikram Batra reporting on duty!
— Sidharth Malhotra (@SidMalhotra) July 25, 2021
The wait is finally over, I’m honoured to present to you the legendary story of our Kargil War Hero. https://t.co/A1Q8voZTzz#ShershaahOnPrime releases on 12th August. Jai Hind🇮🇳#Shershaah @advani_kiara @vishnu_dir @karanjoharCaptain Vikram Batra reporting on duty!
— Sidharth Malhotra (@SidMalhotra) July 25, 2021
The wait is finally over, I’m honoured to present to you the legendary story of our Kargil War Hero. https://t.co/A1Q8voZTzz#ShershaahOnPrime releases on 12th August. Jai Hind🇮🇳#Shershaah @advani_kiara @vishnu_dir @karanjohar
अभिनेता सिध्दार्थ मल्होत्राने हा ट्रेलर आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने आपल्या ट्विटरवर ट्रेलर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''हिरो हे त्यांच्या कथांमधून जीवंत असतात. कारगिल युध्दातील हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांची सत्यकथा घेऊन येताना आम्हाला अभिमान वाटत आहे. हा सिनेमा माझ्यासाठी एक दीर्घ प्रवास होता आणि खरी व्यक्तीरेखा साकारणे अभिमानास्पद होते. 'शेरशाह' प्राईम व्हिडिओवर 12ऑगस्टला येत आहे.''
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सैन्य दलाच्या जवानांनी आणि शालेय मुलांनी 'चक दे', 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों', 'तेरी मिठ्ठी' आणि 'ए वतन' यासारखी देशभक्तीपर गाणी सादर केली.
कोण होते विक्रम बत्रा?
कॅप्टन विक्रम बत्रा हे भारतीय सैन्य दलातील अधिकार होते. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युध्दात त्यांनी अतुलननिय शौर्य गाजवले. 6 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धात पॉइंट 5140, पॉइंट 4875, कारगिल (काश्मीर) येथील कारवाई दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला. ते भारतीय स्थल सेनेतील 13 वी बटालियन, जम्मू काश्मीर रायफल्स मध्ये कॅप्टन पदावरील अधिकारी होते.
हेही वाचा - करण जोहर होस्ट करणार Bigg Boss OTT, सलमानपेक्षा हटके असणार स्टाईल