मुंबई - शनिवारी करिना कपूर खानने पती सैफ अली खानसोबतचा तिचा एक जुना फोटो शेअर केला आहे. फोटोत दोघे एक्रोपॉलिस ऑफ अॅथेंसच्या उंचीवर उभे फोटोला पोज देताना दिसत आहेत. करिनाने आपल्या पोस्टला शीर्षक देऊन लिहिले आहे, "एक्रोपॉलिस मधील मी आणि माझे प्रेम. अॅथेंस २००८."
या फोटोला अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री टिस्का चोप्राने प्रतिक्रियेत म्हटलंय, ''मला हा फोटो खूप आवडला. आनंदीत राहा.'' करिनाच्या एका फॅनने लिहिलंय, ''तुम्ही दोघे एकत्र असताना सुंदर दिसता.''
करिना आणि सैफचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. २०१६ मध्ये त्यांनी मुलगा तैमूरचे आपल्या आयुष्यात स्वागत केले आणि आता हे दोघेही पुन्हा एकदा पालक होण्यास तयार आहेत.
अभिनेत्री अमृता सिंगसोबत सैफचे लग्न झाले होते. या लग्नामुळे त्यांना दोन मुले आहेत- सारा अली खान आणि इब्राहिम अली खान.