मुंबई - अभिनेत्री करिना खानने 'जब वी मेट' या चित्रपटाच्या सेटवरील जुना फोटो शेअर केला आहे. शाहिद कपूरसोबत तिचा हा चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला होता. प्रेक्षकांनी प्रचंड उचलून धरलेला हा चित्रपट आजही लोकप्रिय आहे.
करिनाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत करिनासोबत इम्तियाज अली, शाहिद कपूर प्लेबॅक मॉनिटरमध्ये पाहात असल्याचे दिसते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या फोटोच्या कॅप्शनमध्ये करिनाने लिहिलंय, ''आयुष्यात माणूस जे खरंच मागतो ते वास्तवामध्ये त्याला तेच मिळते, असे मला वाटते.''
करिनाच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलंय, ''या चित्रपटावर आमचे खूप प्रेम आहे, कृपया याचा दुसरा भाग बनवा.''
आणखी एकाने लिहिलंय, ''हा चित्रपट वारंवार पाहतो, तुम्ही आणि शाहिद चित्रपटात चांगले दिसता.''