मुंबई - 'हिंदी मीडियम' या २०१७ मध्ये आलेल्या चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर आता या चित्रपटाचा सिक्वल 'अंग्रेजी मीडियम' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कॅन्सरवरील उपचारांनंतर इरफान खान पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमधील कमबॅकसाठी सज्ज झाला असल्याने हा चित्रपट सुरूवातीपासूनच चर्चेत राहिला.
काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील करिना कपूरचा फर्स्ट लूक शेअर करत तिच्या भूमिकेबद्दलची माहिती देण्यात आली होती. यानंतर आता करिनाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये करिना विमानतळावर दिसत असून चित्रपटातील आपल्या पात्राच्या म्हणजेच पोलिसाच्या वेशभूषेत ती आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
व्हिडिओमधील करिनाचा बिनधास्त अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. दरम्यान या चित्रपटात करिना कपूर आणि इरफानशिवाय राधिका मदनचीही महत्त्वाची भूमिका असणार असून २०२० मध्ये २४ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.