स्वातंत्र्यपूर्व काळात पतौडी कुटुंबीय पतौडी आणि आजूबाजूच्या चाळीसेक गावांचे राज्यकर्ते होते. मन्सूर अली खान, ज्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे कप्तानपद भूषविले, हे शेवटचे नवाब होते. त्यांचा आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांचे पुत्र सैफ अली खानलाही चित्रपटसृष्टी ‘छोटे नवाब’ म्हणून संबोधायचे. आता ते सर्व इतिहासजमा झाले असले तरी पतौडींचं ‘नवबीपण’ जागृत आहे. असो. तर सांगायचं हे की ‘छोटे नवाब’ सैफ अली खानचे लग्न (दुसरे) अभिनेत्री करीना कपूर (पहिले) सोबत झाले. त्यांना पहिले पुत्ररत्न झाले आणि त्यांनी त्याचे नामकरण तैमूर अली खान असे केले. त्यावरून वादंग माजला होता कारण भारतावर राज्य करताना तैमूरने बेसुमार कत्तल केली होती.
सैफिना म्हणजेच सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांना दुसरे अपत्य झाले आणि सर्व ठिकाणी ते त्याचे नाव काय ठेवणार यावरून तर्कवितर्क सुरु झाले. सैफ आणि करीनाला देखील याची कल्पना असणार म्हणूनच त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव लगेच जाहीर केले नाही. तसेच काही आठवड्यांपूर्वी करीनाचे वडील यांनी आपल्या नातवाचे नाव ‘जेह’ ( Jeh ) असल्याचे समाज माध्यमांवरून जाहीर केले. कदाचित कपूर-खान मंडळी लोकांची प्रतिक्रिया काय असेल याची चाचपणी करीत असावेत. बऱ्याच नेटकऱ्यांनी ‘जेह’ हा ‘जहांगीर’चा शॉर्ट फॉर्म असणार असे भाकीत केले होते. आणि आता ते खरेही ठरतेय.
खान-कपूर दांपत्याने अद्याप आपल्या दुसऱ्या बाळाच्या नावाचा खुलासा केलेला नाहीये. परंतु मांजर डोळे मिटून दूध पीत असली तरी इतरांचे डोळे उघडे असतात हेच खरे. करीना ने नुकतेच एक पुस्तक प्रकाशित केले ज्याचे नाव आहे ‘प्रेग्नेंसी बायबल: द अल्टीमेट मॅन्युअल फॉर मॉम्स-टू-बी’ या पुस्तकामध्ये तिने उघड केले आहे की तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर आहे. संपूर्ण पुस्तकात तिने त्याला ‘जेह’ म्हणून संबोधिले असले तरी तिच्या पुस्तकाच्या एका प्रतिमेच्या मथळ्यामध्ये त्याला जहांगीर म्हटले गेले आहे. लोकांचा सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्रक्षोभ होऊ नसे असे वाटल्यामुळे कदाचित ‘सैफिना’ ने आपल्या दुसऱ्या मुलाच्या नावाची अधिकृत घोषणा केली नसावी. तैमूर ला मीडिया ‘छोटे नवाब’ बोलवायची आता ते बिरुद जहांगीर अली खानला मिळेल.
मिालेल्या माहितीनुसार असे कळते की सैफ अली खानला आपल्या पहिल्या मुलाचे नाव ‘फैझ’ ठेवायचे होते. अर्थातच त्याबरोबर अनेक नावांचा विचार झाला होता आणि करीनाने ‘तैमूर’ या नावाला पसंती दिली. प्रसिद्ध उर्दू कवी फैझ अहमद फैझ यांच्या नावावरून सैफला आपल्या मुलाचे नाव ठेवायचे होते परंतु बायकोच्या हट्टापुढे त्याचे काही चालले नाही. सैफला ‘फैझ’ नावाविषयी आकर्षण असण्याचे अजूनही एक कारण असू शकते ते म्हणजे जेव्हा पतौडी राज्य बनविण्यात आलं होतं तेव्हा त्याचा पहिला नवाब होता फैझ तलब खान. दुसऱ्या मुलाच्या नामकरणावेळीही सैफने ‘फैझ’ हेच नाव पुढे केले होते परंतु करीनाने ‘जहांगीर’ या नावावर शिक्कामोर्तब केले.
कदाचित हा सावरासावरीचा प्रयत्न असू शकेल परंतु दोन्ही नावे भारतात घुसखोरी करून त्यावर राज्य करणाऱ्या राजे, तैमूर अली खान आणि जहांगीर (मूळ नाव : नुरुद्दीन मुहम्मद सलीम) यांची, आहेत. करीना कपूर खानचा येणारा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चढ्ढा’ असून त्यात आमिर खान प्रमुख भूमिकेत आहे व येत्या नाताळात तो प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा - अभिनेत्री सरन्या शशी हिने 35 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास