ETV Bharat / sitara

करिनाचा 'अंग्रेजी मीडियम'मधील फर्स्ट लूक प्रदर्शित, साकारणार 'ही' भूमिका - cop

करिना कपूर खानला चित्रपटसृष्टीत १९ वर्ष पूर्ण झाली आहेत. आजच्या दिवसाचं औचित्य साधत तिचा अंग्रेजी मीडियम या चित्रपटातील पहिला लूक शेअर करण्यात आला आहे.

करिनाचा 'अंग्रेजी मीडियम'मधील फर्स्ट लूक प्रदर्शित
author img

By

Published : Jun 30, 2019, 9:01 PM IST

मुंबई - बॉलिवूडची बेबो अशी ओळख असणाऱ्या करिना कपूर खानला चित्रपटसृष्टीत १९ वर्ष पूर्ण झाली आहेत. ३० जून २००० ला 'रिफ्यूजी' या चित्रपटाद्वारे तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. लवकरच करिना 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आजच्या दिवसाचं औचित्य साधत तिचा या चित्रपटातील पहिला लूक शेअर करण्यात आला आहे.

या चित्रपटात अभिनेता इरफान खान मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन होमी अदजानिया करत असून दिनेश विजन यांची निर्मिती असणार आहे. करिना या चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारणार आहे. सध्या लंडनमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे.

kareena kapoor
करिनाचा 'अंग्रेजी मीडियम'मधील फर्स्ट लूक प्रदर्शित

दरम्यान अंग्रेजी मीडियम हा चित्रपट २०१७ मध्ये आलेल्या 'हिंदी मीडियम' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. 'अंग्रेजी मीडियम'च्या माध्यमातून इरफान खान बऱ्याच दिवसांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. चित्रपटात करिना आणि इरफानशिवाय राधिका मदनचीही महत्त्वाची भूमिका असणार असून २०२० मध्ये २४ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.