मुंबई - पूर्वी चित्रपटसृष्टीतील नायिका लग्न, संसार, कुटुंब, गरोदरपण आदी लपवून ठेवायच्या. परंतु आजच्या काळातील हिरॉइन्स या गोष्टींबद्दल बाऊ करीत नाहीत. उलट त्या आपल्या चाहत्यांना शिकवण देतात, अशा गोष्टींमध्ये काय करावे व काय करू नये. गेल्या वर्षी अनुष्का शर्मा, अमृता राव, अनिता हसनंदानी, करिना कपूर खान ई अभिनेत्रींनीं आपले ‘बेबी बम्प्स’ (गरोदरपणांत वाढलेले पोट) दाखवत समाज माध्यमांवर वाहवा मिळविली. अनुष्का गरोदरपणात विराटसोबत ऑस्ट्रेलियात होती. तसेच करिना तर बराच प्रवास करीत होती. नुकतेच करिनाने गरोदरपणात योग करत असतानाचे फोटो पोस्ट केले होते.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये कपूर व खान यांची ‘चालते’ असं म्हटलं जातं. करिनाकडे तर दोन्ही आडनावं आहेत. करिना कपूर खान. तिच्या बाबतीत ‘नाम ही काफी है’....म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लॉकडाऊनमध्ये सगळीकडे नर्व्हस एनर्जी असताना करिना च्या दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या बातमीने सिनेमासृष्टीत उत्साहाची लहर पसरवली. इतकेच नव्हे तर करीनाने गरोदरपणात आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चे चित्रीकरण पूर्ण केले व काही जाहिरातींचे शूटही केले.
करिना कपूर खान आणि तिचे यजमान सैफ अली खान आपल्या दुसऱ्या बाळाची प्रतीक्षा करताना दुसऱ्या घरात जाण्याची तयारीही करीत होते. सध्या राहत असलेल्या बिल्डिंग समोरच त्यांनी दुसरे घर घेतले असून त्यात अत्याधुनिक सुखसोयी आहेत. नुकतेच ते या नवीन घरात शिफ्ट झाले असून नवीन बाळ नवीन घरात प्रवेश करेल. फेब्रुवारीच्या पूर्वार्धात त्याचे नवीन घरात आगमन अपेक्षित असून येणाऱ्या बाळासाठी नवजात बालकांसाठी सुसज्ज अशी खास खोली आहे. बऱ्याच गच्च्या, तरण तलाव, लायब्ररी व तैमूरसाठी खेळण्यासाठी प्रशस्त जागा आहे. हे सेलेब्रिटी कपल साहजिकच थोडाफार तणाव अनुभवत असलं तरी त्यांना घरात पुन्हा दुडूदुडू धावणाऱ्या पावलांची प्रतीक्षा आहे.
हेही वाचा - सृष्टी'ने रचला इतिहास: १५ व्या वर्षी अशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद, २४तास लावणीवर नृत्य
करिना आणि सैफ, तैमूरसोबत नवीन घरात नवीन बाळाच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा - हॉरर-कॉमेडी ‘भूत पोलीस’ च्या चित्रीकरणाची झाली सांगता!