मुंबई - बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीची प्रसिध्द कलाकार करिना कपूर आणि अभिषेक बच्चन यांनी आपल्या कारकिर्दीची २० वर्षे पूर्ण केली आहेत. दोघांनीही 'रिफ्यूजी' या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. याला आता २० वर्षांचा काळ उलटला आहे. दोघांनीही सोशल मीडियावरुन याची आठवण ठेवत पोस्ट शेअर केल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
करिनाने या २० वर्षात अनेक हिट चित्रपट दिले. तिने आपल्या करियरची सुरूवात 'रिफ्यूजी' चित्रपटाने अभिषेक बच्चनसोबत केली होती. त्यानंतर तिने 'कभी खुशी कभी गम', 'हिरोइन,' जब वी मेट ', 'अंग्रेजी मीडियम', '3 इडियट्स', 'उड़ता पंजाब' आणि 'बजरंगी भाईजान' यासारख्या हिट चित्रपटातून भूमिका केल्या. २० वर्षे पूर्ण होत असताना सोशल मीडियावर तिने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो 'रिफ्यूजी' सिनेमातील तिच्या पहिल्या सीनचा आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
करिनाने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, की हा योग्य निर्णय होता. इंडस्ट्रीमध्ये २० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिषेकनेही एक फोटो शेअर करुन आपला आनंद व्यक्त केलाय. या फोटोला त्याने #RoadTo20 हे शीर्षक दिलंय. यामध्ये त्याने साकारलेल्या व्यक्तीरेखा दिसत आहेत. हा फोटो शेअर करीत त्याने एक भावुक पोस्ट लिहिली आहे.
अभिषेकने लिहिलंय, ''एक अभिनेता म्हणून करियरची २० वर्षे पूर्ण करीत आहे यावर विश्वास बसत नाही. हा सुंदर प्रवास होता. भूतकाळाचा विचार करणाऱ्यांपैकी मी नाही आहे, परंतु चांगल्या आणि वाईट गोष्टींचा काळ आठवणीत ठेवणेही आवश्यक असते. #RoadTo20 माझ्या प्रवासाबद्दल सांगण्याचा माझा हा एक प्रयत्न आहे. २२ वर्षानंतर परदेशातून आलेल्या माझ्यासारख्या माणसावर अनेक लोकांनी विश्वास ठेवला, हे थोडे आश्चर्यकारक होते. मात्र आता २० वर्ष पूर्ण करीत आहे.''
हेही वाचा - सुशांतच्या कुटुंबियांनी मानले चाहत्यांचे आभार, त्याच्या अनोख्या गुणांचा केला खुलासा
कॉमेडीपासून थ्रिलर चित्रपटापर्यंत अभिषेकने भूमिका साकारल्या आहेत. यामुळे बॉलिवूडमध्ये त्याच्यासाठी एक खास जागा आहे.